Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. म्हणून मी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलो’; पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर शिव ठाकरेचा फुल्ल स्टॉप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 26, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakare
0
SHARES
48
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ चा रनर अप आणि मराठी प्रेक्षकांची जान शिव ठाकरे याने काल मराठी मनांचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सोशल मीडियावर शिव ठाकरेचा राज ठाकरे यांच्या घराबाहेरील फोटो तुफान व्हायरल झाला. यामुळे शिव आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे गूढ काय..? याबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर काही जणांनी शिव मनसेत एंट्री करणार असल्याचा तर्क लावला आहे. तर काहींनी आगामी प्रोजेक्ट्ची चर्चा करण्यासाठी शिवने राज ठाकरे यांची भेट घेतली असेल असेही बोलले गेले. यानंतर अखेर शिवने या भेटीत काय घडलं याची माहिती माध्यमांना दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिवने मीडियाशी संवाद साधताना सांगितले कि, ‘राज ठाकरे यांनी मला अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मराठी माणूस पुढे पाऊल टाकतो तेव्हा राज ठाकरे कायमच शाबासकी देतात आणि त्याची त्यावेळी खरंच खूप गरज असते. राज ठाकरेंनी मला त्यासाठीच बोलवलं होतं. यावेळी तिथे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेदेखील उपस्थित होत्या. त्या आमच्या बिग बॉसच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. राज ठाकरे हे मराठी मुलं किंवा मुली पुढे जात असतील तर नेहमीच त्यांना शाबासकी देत असतात आणि यापूर्वीही त्यांनी दिली आहे’.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare Squad (@shivthakaresquad_)

पुढे म्हणाला कि, ‘मला मराठीतील अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडून खूप ऑफर आल्या आहेत. मला मराठी आणि हिंदी दोन्हीत काम करायचं आहे. मात्र सध्या मी ‘खतरों के खिलाडी’ साठी तीन महिन्यांसाठी बाहेर जातो आहे, त्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे. मला सर्व काही करायचे आहे. मी नेमकं काय काय करु असा प्रश्न मला पडलाय. ज्या गोष्टींची मी वाट पाहिली ते आता होत आहे. एका मराठी चित्रपटाचे शूटिंगही १० दिवसात सुरु होणार आहे. पण मी मराठीमध्ये प्राधान्याने काम करेन’. असेही शिवने आवर्जून सांगितले.

Tags: mnsRaj ThackreyShiv ThakareSocial Media GossipViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group