हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता शिव ठाकरे सहभागी झाल्यापासून त्याची चांगलीच चर्चा आहे. शिव ठाकरे हा एकमेक स्पर्धक सध्या बिग बॉस १६ चं पर्व गाजवतोय असं म्हटलं जात आहे. अंगापिंडाने मजबूत आणि बौद्धिक क्षमतेने धीट असलेला शिव अलीकडेच घरात भावनिक झाल्याचे दिसले. यावेळी डोळ्यातून अश्रू आणि मुखातून वीणाचं नाव आलं ज्याची चर्चा सर्वत्र राहिली. बाहेरून वीणानेदेखील त्याला पाठिंबा दाखवला. ज्यामुळे त्यांचं वरेकप झालंच रंगली. पण शिवने स्वतःच बिगबॉसमध्ये या नात्यावर व्यक्त होत खुलासा केलाय.
कन्फेशन रूममध्ये रडल्यानंतर एकदा आणि आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात शिवने वीणाच्या नावाचा उल्लेख केला आहे. दरम्यान तो टीना दत्ता आणि साजिद खान यांच्यासोबत बोलताना दिसला होता. बिग बॉस १६ च्या ७ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये, शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या सिजनमध्ये खरोखर प्रेमात पडल्याचा उल्लेख केला.
त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगताप आणि त्याच्या नात्याबद्दल तो व्यक्त झाला. बिग बॉस मराठी या शोमध्ये असतानाच त्याला सह- स्पर्धक वीणा जगतापवर प्रेम जडलं असं त्याने स्पष्ट सांगितले. नंतर ते रिलेशनशिपमध्ये होते. चाहत्यांनी त्यांच्या जोडीला पसंती दिली. पण आता ते एकत्र नाहीत त्यांचं ब्रेकअप झालंय.
शिव म्हणाला कि, ‘मराठी बिग बॉसमध्ये असताना मी वीणाच्या खरोखरच प्रेमात पडलो. आमचं रिलेशनशिप होतं. पण सात महिन्यांपूर्वी आमचं ब्रेक अप झालं. तरीही आम्ही मूव्ह ऑन नाही करू शकलो. तिने स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला वचन दिलं होतं की जे आधीच्या रिअॅलिटी शोमध्ये झालं ते पुन्हा होणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांना माझं नाव माहीत आहे, त्यांना वीणाचं नाव माहीत आहे आणि जे वीणाला ओळखतात ते मला ओळखतात. मी बॉडीबिल्डर आहे, मला शरीरावर टॅटू काढायला आवडत नाही, पण मी वीणासाठी टॅटू काढला होता. या घरात बाहेरच्या जगासारख्या प्रॅक्टिकल गोष्टी होऊ शकत नाही.
Discussion about this post