हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस हिंदीच्या १६ व्या सिजनमध्ये सतत हिंसेचे प्रकार घडताना दिसत आहेत. अलीकडेच अर्चना गौतमने शिव ठाकरेचा गळा पकडल्यामुळे तिला घराबाहेर करण्यात आले. मात्र ती शोला कंटेन्ट देत असल्यामुळे मेकर्सने शिवला व्हिलन ठरवून तिला घरात परत आणलं. यानंतर नुकतीच शालीन भनोत आणि एमसी स्टॅन यांची जोरदार भांडण झाली. ज्यामध्ये ते एकमेकांवर धावून गेले.
दरम्यान स्टॅनने शालीनला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिव मध्ये पडला आणि त्याने दोघांना बाजूला केलं. यावेळी शालीन आणि स्टॅन दोघेही रागात असल्यामुळे त्यांना वेगळं करणं शिवलाही जड गेलं. असं असताना शिवने शालीनचा गळा पकडला असं बोललं गेलं. दुसरीकडे प्रियांका सतत शिव कसा वाईट आणि शिव कसा प्लॅनिंग करतो हे बोलताना दिसले. यामुळे अखेर शिवची बहीण भडकली आणि शेवटी व्यक्त झालीच.
मराठी बिग बॉस २’चा विजेता आणि बिग बॉस हिंदी १६’चा स्पर्धक शिव ठाकरे याची बहिण मनीषा ठाकरेने मीडियाशी बातचीत करताना काही मुद्यांवर स्पष्ट भाष्य केले आहे. शिव ठाकरेच्या बहिणीने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय कि, ‘ज्या पद्धतीन शिवचा मुद्दा उगाचच मोठा केला गेला, त्याने आम्ही दुःखी झालो आहोत.
पूर्ण गेम एकमेकांना भडकवण्याचा आहे. सलमान खान म्हणाल्यानुसार, बिग बॉसच्या घरात बाहेरच्या मुद्द्यांना घेऊन बोलायचं नाही. पण यात शीवने देखील आपली चूक मान्य केली होती. शालिन आणि शीवमध्ये खोलीच्या आत बोलणं झालं त्यामध्ये शालीनं म्हणाला होता कि, फक्त शिव अर्चनाला गप्प करू शकतो. कारण त्याला तिची नस कळली आहे. शिवनं तिला मजेमजेत छेडलं होतं ना कुठल्या चुकीच्या हेतूने.’
मनिषा पुढे म्हणाली कि, ‘भांडणादरम्यान बोललं गेलं की, शिवने अर्चनाचा हात पकडला. पण क्लीप पाहिल्यावर कळलं की, तो आपला हात सोडवायचा प्रयत्न करतोय. त्याने धक्काही दिला नाही. यावर कोणाचं काहीच म्हणणं नाही. ते का दुर्लक्षित केलं गेलं..? मला या गोष्टीवर विश्वास आहे की ज्या पद्धतीने अर्चनाला शारिरीक हिंसेनंतर पुन्हा घरात घेतलं तशी संधी शिवला किंवा इतर कोणाला मिळालीचं नसती. मिळाली असती का..?
ती चांगली खेळतेय, शोला कंटेट देतेय म्हणून तिला परत आणलं आणि आम्हाला याचा काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा ती जाताना बिग बॉसला आणि शिवला घरात राहू देण्याची विनंती करत होती तेव्हा तर शिवने तिला माफ केलेलं पण ती पुन्हा अशी वागणार नाही याची गॅरंटी देऊ शकत नव्हता. तेव्हा घरातील सगळे त्याच्या बाजूने असल्यामुळे त्याच्यावर जबाबदारी होती. अर्चनाने मुद्दाम केलं नसेल पण शिववर तिला बेघर केल्याचा ठप्पा मुद्दाम पाडला गेला.’
शीवच्या गेमबद्दल बोलताना मनिषा म्हणाली, ‘तो चांगला खेळतोय. जिथे गरज आहे तिथे योग्य निर्णय घेतोय. जेव्हा अडचण येते तो चांगला सामना करतोय. मराठी बिग बॉसचा अनुभव तो इथे चांगला कामी आणतोय. बिग बॉस साजिद खान, शिव ठाकरे, अब्दु रोझिक आणि एमसी स्टॅंड, निमृत कौर अहलूवालियाला यांना पाठिंबा देत असल्याचं बाहेर बोललं जातंय पण हि ‘अफवा’ आहे. शिव चांगला लीडर आहे. तो सगळ्यांचा विचार करतो आणि त्याच्या या ईमानी स्वभावामुळे सगळे त्याला पाठिंबा देतात.
पण प्रियंकाचं भलतंच आहे. ती नेहमी शिवनं प्लॅनिंग केलं असंच बोलताना दिसते. मग विषय साजिद यांच्या कॅप्टनशीपचा असो किंवा आणखी काही.. प्रत्येकजण आपापल्या डोक्याने खेळतोय. प्रत्येकवेळी कुणी शिवचं ऐकत नाही हे स्पष्ट आहे. प्रियंकाला वाटतं ती स्ट्रॉंग आहे. पण मला वाटतं ती शिवबाबत इनसिक्योर आहे. तिच्या डोक्यात शिवविरुद्ध कटकारस्थान शिजत असतं असं कायम आम्हाला वाटतं. कारण ती प्रत्येक गोष्टीसाठी शिवला जबाबदार ठरवते.’
Discussion about this post