हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज कि.. जय! या शब्दांत इतकी ताकद आहे कि याचा उद्घोष ऐकताच प्रत्येक मराठ्याच्या अंगातलं रक्त आपोआपापच सळसळू लागत. शिवरायांचा इतिहास एक असे पर्व एक असे युग आहे ज्यात आपणही असतो तर राजेंसाठी लढायला आणि मरायला तयार झालो असतो अशी भावना अगदी लहानग्यांतदेखील जिवंत आहे. याचे कारण एकच कि राजा कसा असावा तर माझ्या शिवबासारखा आणि म्हणूनच आजही त्यांचा जाज्वल्य इतिहास धगधगतोय. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी स्वराज्य सौदामिनी ताराराणी हि मालिका याच इतिहासाचा एक भाग दर्शविते. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त या मालिकेचा विशेष भाग प्रसारित होणार आहे. शिवाय सेटवर शिवरायांना मानवंदना देखील देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या कलाकारांनी सेटवर शिवजयंती साजरी केली. यावेळी शिवरायांची शौर्यगाधा सर्वांसमोर मांडण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या सेटवर दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके करण्यात आली.
मुख्य म्हणजे हि प्रात्यक्षिके लहान मुलं सादर करत होती त्यामुळे हा माहोल आणखीच रंजक वाटत होता. या लहानग्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास असा काही उभा केला कि अंगावर शहाराच उभा राहिला.
शिवरायांचा इतिहास आजच्या पिढीला माहित असावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. त्यापैकी एक माध्यम म्हणजे मालिका. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेतून याच इतिहासाचे एक पर्व उलघडले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील’ ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा शिवजयंतीनिमित्त अत्यंत विशेष भाग प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या मालिकेचा हा भाग शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या मालिकेत स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ च्या भूमिकेत स्वरदा थिगळे असून छत्रपती राजाराम राजेंची दमदार भूमिका अभिनेता ‘संग्राम समेळ’ने साकाराली आहे. तर यतीन कार्येकर यांनी औरंगजेबाची भूमिका केली आहे आणि आजच्या भागात शिवरायांच्या भूमिकेत अमोल कोल्हे पहायला मिळतील.
Discussion about this post