Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आमच्या सुनेला त्रास देऊ नको, नाहीतर..’; शिवानीच्या रिअल लाईफ सासूबाईंनी दिला भुवनेश्वरीला दम

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 13, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका सुरु आहे. सध्या मालिकेने अत्यंत उत्कंठावर्धक वळण घेतलं आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता हृषीकेश शेलार यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत हृषीकेश म्हणजेच अधिपतीच्या आईची भूमिका अभिनेत्री कविता मेढेकर साकारत असून मालिकेच्या कथानकानुसार त्या शिवानीला म्हणजेच अक्षराला नेहमी आडव्या जाताना दिसतात. म्हणूनच शिवानीच्या सासूबाईंनी एक खास पोस्ट शेअर करत त्यांना दम दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hrishikesh Shelar (@hrishishelar)

शिवानी तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. गतवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शिवानीने अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत लग्न केलं. यामुळे विराजची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तिच्या खऱ्या आयुष्यातील सासूबाई झाल्या. त्यांचासोबत तिचं फार छान बॉण्ड आहे. म्हणूनच खऱ्याखुऱ्या सासूबाईंनी रील लाईफ सासूबाईंना दम दिला आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत लवकरच कविता मेढेकर या शिवानीच्या सासूची भूमिका बजावताना दिसणार आहेत. या निमित्ताने शिवानीची ऑनस्क्रीन सासू आणि ऑफस्क्रीन सासू एकमेकींना भेटल्या होत्या आणि या भेटीचा एक फोटो मृणाल कुलकर्णी यांनी शेअर करत एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Hrishikesh Shelar (@hrishishelar)

मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांचे फॉलोवर्स खूप आहेत. सोशल मीडियावर त्या अनेकदा त्यांच्या सुनेबद्दल म्हणजेच शिवानीबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता त्यांनी त्यांचा आणि मालिकेमध्ये शिवानीचा म्हणजेच अक्षराचा राग राग करणाऱ्या भुवनेश्वरी अर्थात कविता मेढेकर यांचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘आमच्या सुनेला जास्त त्रास देऊ नको बरं का!! नाहीतर तुला शिकवीन चांगलाच धडा!!!’ मृणाल कुलकर्णी यांची ही मजेशीर पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे. खऱ्या आयुष्यात मृणाल कुलकर्णी आणि कविता मेढेकर यांची चांगली मैत्री आहे.

Tags: Facebook PostKavita medhekarmrunal kulkarniShivani Rangoletv serialViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group