हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची चंद्रा अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर एक उत्तम नृत्यांगना आहे हे आपण सारेच जाणतो. म्हणूनच आपल्या अभिनयासह नृत्याची एक वेगळीच छाप पाडण्यासाठी अमृताने कलर्स टीव्हीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्सिंग रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेतला.
गेला काही काळ तिने आपल्या कमाल परफॉर्मन्सने सगळ्यांच्या दिलावर राज्य केलं. शोमध्ये अगदी टॉप करणारी अमृता बाजी मारणार असंच सगळ्यांना वाटत होत. इतक्यात तिच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे.
माहितीनुसार, अमृता खानविलकर हि ‘झलक दिखला जा’ शोमधून एव्हीक्ट होऊन बाहेर पडली आहे. टॉप ३ मध्ये अमृता पोहोचेल अशी सगळीकडे चर्चा सुरू होती. मात्र तिचा झलकच्या मंचावरील प्रवास इथेच थांबला आणि ती बाहेर पडली. इतकेच नव्हे तर अमृतासोबत पारस कलनावत हा देखील स्पर्धेबाहेर पडला आहे.
तसं प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धक शोबाहेर होणे हाच याचा फॉरमॅट आहे. मात्र यावेळी शोमध्ये डबल एलिमिनेशन झाले आणि यामध्ये अमृताचा प्रवास इथेच थांबला. या प्रवासाबद्दल अमृताने आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने संपूर्ण झलकची जर्नी व्हिडिओतून शेअर करीत सोबत कॅप्शन लिहिले आहे.
एव्हिक्शन झाल्याचे सांगताना अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओ पोस्टसह तिने लिहिलं कि, ‘गेले दोन महिने काही विलक्षण होते आणि मला या वर्षात सर्वात आनंदी करणारे… पण आज एपिसोड प्रसारित होत असताना मी #jhalakdikhlajaa10 च्या सुंदर स्टेजला निरोप देत आहे.
आज जेव्हा मी अलिबागमध्ये चांदण्या आकाशाखाली बसून मागे वळून पाहते तेव्हा माझ्याकडे फक्त या कार्यक्रमाच्या आणि माझ्या प्रवासाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लोकांच्या आठवणी आहेत. माधुरी दीक्षित यांना भेटणे हे माझे स्वप्न होते आणि माझ्या देवाने मला माझ्या स्वप्नापलीकडे काहीतरी दिले. त्याने मला तुमच्यासमोर सादर करण्याची संधी दिली.
करण जोहर इतके दयाळू आणि उदार असल्याबद्दल धन्यवाद…. नोरा फतेही तुम्ही नेहमीच मला प्रेरणा देता. मनीश पॉल भाई आपके जैसा कोई नहीं… तू जे करतोस ते करायचा कुणी विचारही करू शकत नाही. तू शोची जान आहेस.’
याशिवाय अमृताने नृत्य दिग्दर्शक, सह स्पर्धक, कलर्स टीव्ही, शो मेकर्स, प्रेक्षक असा प्रत्येकाचे आभार मानले आहेत. साहजिकच जिने चंद्रा होऊन संपूर्ण महाराष्ट्राला थिरकवलं तिच्या एव्हिक्शनमध्ये तिच्या चाहत्यांनाच नव्हे तर झलकच्या प्रेक्षकांनाही मोठा धक्का लागला आहे. अमृताला स्वतःलाही या एव्हिक्शनचा धक्का लागला मात्र तिच्यासाठी हि स्पर्धा खूप काही देऊन गेली. या स्पर्धेने तिला तिच्या आयडियल समोर सादर होण्याची संधी दिली.
त्यामुळे अमृता म्हणते कि, ‘मला कधी वाटतं नव्हतं, कि इतक्यातच या स्पर्धेतून बाहेर पडेन. परिक्षक माधुरी यांनी मला १०१ रुपयाचं बक्षिस दिलं होतं आणि तो क्षण मात्र या प्रवासातला आणि माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे.’
Discussion about this post