हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच एक कदम आगे अशी राहिली आहे. या मालिकेतील ट्विस्ट नेहमीच प्रेक्षकांना भावले आहेत. साध्य मालिका अशा वळणावर येऊन ठेपली आहे कि प्रेक्षकांचेही डोळे मोठे होतील. चालू कथानकानुसार, अनघा गरोदर असताना तिचा नवरा आणि अरुंधतीचा मुलगा अभिषेकचे विवाहबाह्य संबंध असतात.
अरुंधती हे सत्य सर्वांसमोर उघड करते आणि याचा अनघाला धक्का बसतो. डोहाळे जेवणातील हा प्रकार इतक्या टोकाला जातो कि अनघाची प्रकृती बिघडते आणि उपचारांदरम्यान तिचा व बाळाचा जीव जातो.
आपण आतापर्यंत पहिले असेल कि, अभिषेकला दुसऱ्या मुलीसोबत अरुधंती रेस्टोरंटमध्ये पाहते. त्यानंतर अनघाच्या डोहाळे जेवणात अभिचे विवाह बाह्य संबंध असल्याचे ती सगळ्यांसमोर सांगते. ज्याचा गरोदर अनघाला त्रास होतो. अनघा बेशुद्ध होते आणि त्यामुळे उपचारांसाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेतात. इथे अरुंधती सगळ्यांकडे अनघाच्या प्रकृतीची चौकशी करत असते. पण कुंमीची तिला काहीही नीट उत्तर देत नसतं. इतकंच काय तर अनिरुद्ध तिला कामावर जा तुझ्या असेही म्हणतो. तर आशाताई त्यांच्या मुलीच्या अवस्थेसाठी अरुंधतीला जबाबदार धरतात.
दुसरीकडे अभिषेक अरुंधतीला अनघाला पाहण्यापासून अडवतोय आणि तिच्यापासून लांब रहायला सांगतो. अंगावर उपचार करणाऱ्या डॉ. रेवती बाहेर येतात आणि आम्ही अनघा आणि तिच्या बाळाला वाचवू शकलो नाही असे सांगतात. या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेली हि धक्कादायक गोष्ट खरंच सत्यात घडली असेल का..? की हे केवळ अरुंधतीचं स्वप्न आहे..? अनेकांनी हे स्वप्न असेल, अनघा सुखरूप असेल अशी आशा लावली आहे. पण आता नेमकं काय होणार हे जाणून घेण्यासाठी तर मालिकेचे पुढील भागच पाहावे लागतील.
Discussion about this post