Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘टकाटक २’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Takatak 2
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टकाटक या चित्रपटाच्या यशानंतर व प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर टकाटक २ लवकरच येणार आहे. या चित्रपटाचा पुढील भाग बनवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या घोषणेनंतर लगेचच ‘टकाटक २’ च्या शूटिंगचा शुभारंभही करण्यात आला आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून ‘टकाटक २’च्या शूटिंगचा मुहूर्त घेण्यात आला आहे. ‘टकाटक २’ची निर्मिती ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम करीत असून सहनिर्माते जगत सिंग आहेत. ‘टकाटक’ या चित्रपटाप्रमाणेच ‘टकाटक २’च्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Zumber Kavde (@milindkavde)

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मोशन पोस्टरला मिळालेल्या यशाचा आनंद सेलिब्रेट करीत ‘टकाटक २’च्या टीमने चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात प्रेक्षकांना तरूणाईवर आधारित असे कथानक पहायला मिळणार आहे. ‘टकाटक २’ची संकल्पना मिलिंद कवडे यांची असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड यांनी कथानकाला पोषक असे उत्तम संवादलेखन केले आहे.निलेश गुंडाळे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असून या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणा-या कॅमेरामन हजरत शेख वली यांच्या नजरेतून नयनरम्य लोकेशन्समधील निसर्ग सौंदर्य प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

https://www.instagram.com/p/CNl3Tsmpxwq/?utm_source=ig_embed

या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेश सोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्या देखील कथानकाचीच्या पूरक भूमिका असणार आहेत. ‘टकाटक २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती देण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावना मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे. रसिकांनी जसं ‘टकाटक’वर भरभरून प्रेम केलं तसेच ‘टकाटक २’वरही करावं आणि ते करतीलही अशी आशाही कवडे यांनी व्यक्त केली आहे.

Tags: Bharat GaneshpureMilind kavadePrathmesh ParabTakatakUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group