हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. ज्यांच्या आठवणी न पुसणाऱ्या आहेत. ज्यांची गाणी चिरंतर आहेत. ज्यांनी लोकसंगीताचा वारसा जागवला त्या जाहिरांची स्तुती करावी तेव्हढी थोडी. त्यामुळे आजही शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्र तितकेच प्रेम करतो जितके काल करत होता. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आजही स्मरणात आहे. पण शाहीर साबळे यांचा विसर पडू नये म्हणून त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे हा वारसा पुढे नेत आहेच. शिवाय शाहिरांच्या आयुष्यावर जीवनपट बनवीत आहे. जो चांगलाच चर्चेत आहे. महाराष्ट्र शाहीर असे त्याचे नाव असून आज विजयादशमीच्या मुहूर्तावर याचे शूटिंग सुरु केले आहे. याची माहिती स्वतः केदार शिंदे यांनी दिली आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आज विजायदशमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सातारा आणि वाई या भागात प्रामुख्याने होणार आहे.
यासंदर्भात केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘मायबाप हो, विजयादशमीच्या या शुभमुहूर्तावर ‘महाराष्ट्र शाहीर’च्या चित्रीकरणास सुरुवात करत आहोत..! हे शिवधनुष्य उचलण्यासाठी तुमचा आशीर्वाद, प्रेम पाठीशी राहूद्या हीच या मंगल दिवशी प्रार्थना..! आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना ‘महाराष्ट्र शाहीर’ टीमतर्फे दसऱ्याच्या खूप शुभेच्छा! भेटूया २८ एप्रिल २०२३ मध्ये फक्त सिनेमागृहांत.’
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात मुख्य भूमिका शाहीर साबळे हि आहे आणि या भूमिकेसाठी अभिनेता अंकुश चौधरीची निवड करण्यात अली आहे. मध्यंतरी अंकुशचा शाहिरांच्या भमिकेतील एक खास लुक देखील समोर आला होता. ज्याला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.
तसेच शाहीरांच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आणि त्यांच्या संघर्षात त्यांच्यासह भक्कम उभी राहिलेली त्यांची पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’ यांची भूमिका केदार शिंदे यांची मुलगी, सना शिंदे साकारत आहे. या चित्रपटातून तिचे खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण होत आहे.
Discussion about this post