हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीतील लाडका अभिनेता आणि लाखो तरुणींच्या गळ्यातला ताईत अभिनेता श्रेयस तळपदे गेल्या काही दिवसांपासून सतत ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. एकतर पुष्प चित्रपटातील मुख्य नायकाची त्याने दिलेला आवाज आणि दुसरं म्हणजे झी मराठचीह्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत तो साकारत असलेला यश सर्वानाच भावला आहे. यानंतर आता मोठ्या विश्रांतीनंतर श्रेयस पुन्हा एकदा बायोपिक चित्रपट करताना दिसणार आहे. ‘इक्बाल’ नंतर आता ‘कौन प्रवीण तांबे?’ या आगामी चित्रपटात श्रेयस क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसेल ज्याचा फर्स्ट लूक त्याने शेअर केला आहे.
‘कौन प्रवीण तांबे?’ असं या बायोपिक चित्रपटाचं शीर्षक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. यामध्ये क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. वय हा केवळ आकडा आहे, ही म्हण प्रवीण तांबे यांना लागू होते. कारण वयाच्या ४१व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून ‘इंडियन प्रीमिअर लीग’मध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या तांबेंनी वयानुसार स्वप्न पहिली जात नाहीत हे सिद्ध केलं. श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर या बायोपिकचा फर्स्ट लूक शेअर केलाय. येत्या १ एप्रिल रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘कौन है प्रवीण तांबे? क्रिकेटमधील सर्वांत अनुभवी पदार्पण आणि सर्वांत प्रेरणादायी क्रिकेट स्टोरी’, असं कॅप्शन देत श्रेयसने हि पोस्ट केली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर ९ मार्च २०२२ रोजी म्हणजेच उद्या प्रदर्शित होणार आहे. यामध्ये श्रेयससह आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. श्रेयस जवळपास १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्यात अशी सुवर्णसंधी एकदाच येते, अशी भावना त्याने एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. या भूमिकेसाठी मेहनत घेताना श्रेयसला प्रवीण तांबे यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं असं त्याने म्हटलं आहे.
Discussion about this post