Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पैसा तोह सबको मंगताय.. मेरेको भी चाहिये’; सचिन पिळगांवकरांची लेक वेश्येच्या भूमिकेत दिसणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 15, 2022
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shriya Pilgaonkar
0
SHARES
204
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर हि दोन नावे मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाने घेतली जाणारी नावे आहेत. या जोडप्याने मराठी तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीसह, मालिकांच्याही माध्यमातून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आज पुढील पिढ्या मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहेत. ज्यामध्ये त्यांची लेक श्रिया पिळगांवकर सुद्धा आहे. ‘गिल्टी माइंडस्’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ सारख्या सीरिजमध्ये दर्जेदार व्यक्तीरेखा साकाल्यानंतर आता श्रिया आणखी एका सिरीजमधून आपल्या भेटीस येत आहे. मात्र यावेळी ती एका वेश्येच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

डिस्नी + हॉट स्टारवर रिलीज होणाऱ्या आगामी ‘ताजा खबर’ या वेब सीरिजमधून श्रिया पिळगांवकर भूवन बामसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘ताजा खबर’ या सीरिजमधून श्रियाने आधी कधीही न केलेल्या अशा वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेतून आपल्या भेटीला ती येणार आहे. या सीरिजमध्ये श्रियाने एका वेश्येची भूमिका साकारली आहे. याआधी प्रेक्षकांनी मिर्झापूरमधील ‘स्वीटी’, गिल्टी माइंड्स मधील ‘कशफ’ आणि द ब्रोकन न्यूज मधील ‘राधा’ तिच्या या भूमिकांना भलतंच प्रेम दिलं आहे. मात्र आता ती जी भूमिका साकारते आहे त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे श्रियाच्या या भूमिकेला किती प्रेम मिळते याबाबत ती स्वतःदेखील उत्सुक आहे.

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने तिच्या या भूमिकेविषयी सांगितले की, ‘ताजा खबरसारख्या सीरिजमध्ये मी आहे याचा मला खूप आनंद होतोय. या भूमिकेसाठी मी खूप उत्साही देखील आहे. कारण वेश्येची भूमिका मी पहिल्यांदाच साकारते आहे. हा अनुभव माझ्यासाठी खूपच नवीन होता. लोकांनी मला ‘गिल्टी माइंड्स’ मध्ये वकीलाची आणि ‘द ब्रोकन न्यूज’ मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत पाहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

त्यामुळे मी भूवन बाम सोबत कॉमेडी जॉनर असलेल्या ‘ताजा खबर’ या सीरिजमध्ये एका वेश्येची भूमिका साकारताना खूप एक्सायटेड होती. माझ्या लूक सोबत आणि परफॉर्मन्ससोबत प्रयोग करणं खूप मजेदार अनुभव होता. त्यामुळे आता लोक या माझ्या भूमिकेला कसं स्विकारतील हे जाणून घेण्यास मी खूप उत्सुक आहे’.

Tags: Bhuvan BamInstagram PostOfficial TrailerShriya PilgaonkarUpcoming Web Series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group