हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबी मार्फत या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येचं गूढ अजून उलगडलेले नाही . सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून त्याचे कुटुंबीय आणि चाहते प्रार्थना करत असतात. सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने ‘जस्टिस फॉर सुशांत’ असं एक कॅम्पेनच सुरु केलं आहे. विशेष म्हणजे लवकरच ती ‘मन की बात’ नावाचा एक कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुशांतचे चाहते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
“न्याय आणि सत्यासाठी आपण मन की बात फॉर एस.एस.आर. हा कार्यक्रम आपण करणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र येऊया.” अशा आशयाचं ट्विट करुन श्वेताने या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. शिवाय या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग नरेंद्र मोदींना पाठवावे अशी विनंती तिने सुशांतच्या चाहत्यांना केली आहे. हा कार्यक्रम येत्या १४ ऑक्टोंबरला होणार आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला रोज वेगवेगळं वळण मिळत असून नुकतेच एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला असून सुशांतच्या हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला आहे. सुशांतने आत्महत्याच केली आहे असं शिक्कामोर्तब करण्यात आलं आले. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’