Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सिद श्रीरामचे मराठी संगीतसृष्टीत पदार्पण; ‘हर हर महादेव’साठी छेडले ‘वाह रे शिवा’चे सूर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 4, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Har Har Mahadev
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी स्टुडिओ निर्मित हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. अशीच एक गोष्ट संगीताच्या बाबतीतही घडली आहे. चित्रपटात ‘वाह रे शिवा’ हे गाणं संध्या आकर्षण ठरतंय. हितेश मोडक यांच्या जबरदस्त संगीताने आणि मंगेश कांगणे यांच्या तेवढ्याच ताकदीच्या शब्दांनी सजलेलं हे गाणं दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय गायक सिद श्रीरामने गायले आहे. या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केले आहे. या गाण्यात अवघड असणारे शब्दही त्याने अतिशय सफाईदारपणे उच्चारले आहेत. त्याच्या भाषेवरचा दाक्षिणात्य प्रभाव यामध्ये कुठेही जाणवत नाही हे काय ते खास.

View this post on Instagram

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)

हर हर महादेव या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट ही भव्यतेला साजीशी आणि वेगळ्या स्वरुपाची असावी असा प्रयत्न या चित्रपटाच्या टीमद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे संगीताच्या बाबतीतही हे वेगळपण जाणवणार आहे. चित्रपटातील प्रत्येक गाण्यावर आणि पार्श्वसंगीतावरही विशेष मेहनत घेतली आहे. यातील एक महत्त्वाचं गाणं म्हणजे वाह रे शिवा. या गाण्याबद्दल बोलताना गीतकार मंगेश कांगणे म्हणाले की, ‘छत्रपती शिवरायांचं वर्णन करणारी लाखो गाणी आजवर बनली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बनणा-या गाण्यात काय नवेपण मांडायचं हे खरं तर एक आव्हानच असतं. परंतू छत्रपती शिवाजी महाराज एवढं नाव जरी ओठांवर आलं तरी आपसूकच शब्द सुचत जातात. तसंच या गाण्याच्याही बाबतीत झालं आहे.
वैरी उभा बिकट घडी
बेभान झेप-उडी
समशेर धीट खडी
वाह रे शिवा
या ओळींनी सुरुवात होणा-या या गाण्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असणा-या ओळी म्हणजे
लुटली शान शरम त्याला उभं छाटलं
रुप तुझं शिवा देवाहून मोठ्ठ वाटलं

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

 

“महाराष्ट्रावर सुल्तानी संकट आलेलं असताना त्याविरोधात खंबीरपणे उभं राहून सुल्तानशाहीला आव्हान देण्याचं आणि मराठी जनतेचं रक्षण करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचं रुप हे देवाहून मोठ्ठं वाटावं ही भावना साहाजिकच मनात येते. तीच भावना या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं” मतही मंगेश कांगणे यांनी यांनी मांडलं. पारंपरिक आणि आधूनिक वाद्यांचा मेळ घालत हितेश मोडक यांनी एक नवी उर्जा निर्माण करणारं संगीत या गाण्याला दिलं आहे.

 

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

यावर्षी लोकप्रियतेचे नवनवे विक्रम रचलेल्या पुष्पा चित्रपटातील सुप्रसिद्ध श्रीवल्ली हे गाणं सर्वांनीच ऐकलेलं आहे. हे मूळ दाक्षिणात्य गाणं गायलं आहे लोकप्रिय गायक सिद श्रीराम याने. ज्याला सोशल मीडियावर करोडोमध्ये व्ह्युव्ज मिळाले आहेत. केवळ हेच गाणं नाही तर सिद श्रीरामच्या प्रत्येक गाण्याला अशाच प्रकारे करोडो व्ह्युव्ज मिळत असतात एवढी त्याची लोकप्रियता आहे. आजच्या घडीला तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातीळीवर ख्याती मिळवणा-या या गायकाचं मराठीत पदार्पण होणं ही विशेष बाब आहे. सिद श्रीरामच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही लोकप्रिय ठरेल असा विश्वास चित्रपटाचा संगीतकार हितेश मोडकने व्यक्त केला. हा चित्रपट येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबर २०२२ रोजी मराठीसह पाच भारतीय भाषांमधून भारतभर प्रदर्शित होणार आहे.

Tags: Har Har MahadevInstagram PostMarathi Historical MovieSharad KelkarSid Sriramsubodh bhave
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group