हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदीत सलमान खान आणि मराठीत महेश मांजरेकर यांच्याशिवाय बिग बॉस या शोला काही मजा नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शोचा होस्ट म्हणून प्रेक्षक नेहमी याच कलाकारांना पाहू इच्छितात. पण अलीकडे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता महेश मांजरेकर यांचा बिग बॉस मराठी शोसोबत केलेला करार हा केवळ ३ सिजनपुरता होता. त्यामुळे यंदाचा चौथा सीजन करण्यास ते बांधील नाहीत. यामुळे आता बिग बॉस मराठी ४ चं होस्टिंग कोण करणार असा प्रश्न पडला होता… यातच अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या नावाची चर्चा सुसाट सुरु झाली. अखेर एका वृत्त माध्यमाने सिद्धार्थशी बातचीत केली असता त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवला एका डिजिटल वृत्ताच्या टीमने संपर्क केला होता. तेव्हा बिग बॉस मराठी ४ चे सूत्रसंचालन तू करणार अशी चर्चा सुरू आहे, त्याविषयी तुला काय म्हणायचंय..? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर अगदी हसत हसत अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘अनेक दिवसांनी सिद्धार्थ जाधव हे नाव चर्चेत आहे तर येऊ दे. मला आवडत आहे. मी आताच यावर कोणतेही उत्तर देऊन माझ्या विषयीची चर्चा का थांबवू. थोडा धीर धरा. चार दिवस थांबा. मी स्वतः बातमी देईन.’
यानंतर याच संदर्भात कलर्स मराठी बहिणीसोबत संपर्क साधला असताना मेकर्सनेही आपली प्रतिक्रिया दिली. मेकर्स म्हणाले कि, ‘अजून काहीच ठरलेलं नाही. पण मांजरेकरच सूत्रसंचालन करणार की सिद्धार्थ जाधव..? यावर तूर्तास पॉझ घेणेच योग्य आहे. त्यामुळे आता उत्सुकता आणखीच वाढली आहे. कारण येत्या ४ दिवसांतच सिद्धार्थ स्वतःहून माहिती देणार आहे. हि माहिती नेमकी काय आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पण मुख्य म्हणजे, प्रेक्षकांना महेश मांजरेकरांनीच होस्टिंग करावं असं वाटत आहे. पण काही कारणास्तव मांजरेकरांना न जमल्यास सिद्धार्थचं होस्टिंग करणार असेल तर त्यांची हरकतदेखील नाही हे महत्वाचं आहे.
Discussion about this post