Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आमच्यात सगळं काही व्यवस्थित आहे..; घटस्फोटाच्या बातम्यांवर भडकला सिद्धार्थ जाधव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Siddharth Jadhav
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या काहीच दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणार आहे अशा चर्चांना उधाण आलं होत. याच कारण म्हणजे सिद्धार्थची पत्नी तृप्ती अक्कलवार जाधव हिने तिच्या अधिकृत सोशल मीडियावरुन जाधव हे सासरचं आडनाव हटवून फक्त माहेरचं अक्कलवार हेच आडनाव ठेवलं होत. शिवाय गेल्या काही काळापासून ते एकत्र राहत नसल्याच्याही चर्चा होत्या. ज्यामुळे आता लवकरच सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत अशी चर्चा होती.मात्र नुकतेच एका वेबसाईटसोबत बोलताना अभिनेता सिद्धार्थ जाधव याने या चर्चां अफवा असल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. म्हणून ते लवकरच घटस्फोट घेऊन वेगळे होणार आहेत अशा विविध अफवा पसरवल्या जात असताना अखेर सिद्धार्थने यावर मौन सोडले आहे. सिद्धार्थने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले कि, ‘या सर्व अफवा कुठून पसरवल्या जात आहेत हे मला कळत नाही. आम्ही एकत्र आहोत. आमच्यात सर्व काही व्यवस्थित आहे.’ ही प्रतिक्रिया देताना सिद्धार्थने आपला संताप आणि चिडचिड व्यक्त केली. कौटुंबिक मतभेदामुळे गेल्या २ वर्षांपासून तुम्ही वेगळे राहत आहात का..? असा प्रश्न यावेळी एका पत्रकाराने सिद्धार्थला विचारला असता त्याने यावर ‘सब कुछ ठीक है’ अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर पुढे काहीही बोलण्यास त्याने नकार दिला.

View this post on Instagram

A post shared by Trupti V Akkalwar (@truptiakkalwar)

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या २ वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. पण याबाबत कोणीतीही अधिकृत माहिती सिद्धार्थ आणि तृप्तीकडून मिळालेली नाही. अभिनेता सिद्धार्थ आणि तृप्ती यांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी २००७ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना स्वरा आणि इरा नावाच्या दोन गोड मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीने डान्सिंग रिऍलिटी शो झलक दिखला जा’मध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा सर्वानाच तृप्ती आणि सिद्धार्थची केमिस्ट्री भावली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काहीतरी गडबड सुरु आहे असे अंदाज वर्तवले जात आहेत. शिवाय तृप्ती आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. आता खरं काय आणि खोट काय ते ता दोघांचं त्या दोघांनाच ठाऊक.

Tags: Instagram Postmarathi actorRumouresSiddharth JadhavTrupti Jadhav
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group