Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

साऊथच्या कलाकरांसोबत झळकणार आपला सिद्धू; आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in Trending, Hot News, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात आपल्या कमालीच्या अभिनयाने आणि कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आपला सिद्धू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच एक नवा सिनेमा घेऊन येतो आहे. नेहमी खळखळून हसणारा आणि हसवणारा हा अभिनेता सदानकदा ऊर्जेने भरलेला असतो. सिद्धार्थ जाधव म्हणजे एनर्जीचा एक वेगळाच डोस. विविध नाटकं, मराठी चित्रपट, हिंदी सिनेमांमध्ये कमालीच्या भूमिका साकारल्यानंतर आता सिद्धू दाक्षिणात्य कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. गांधी जयंतीनिमित्त त्याने आपल्या आगामी चित्रपटाच्या टिझर शेअर करून याबाबत घोषणा केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

रविवारी २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात गांधी जयंती साजरी केली गेली. यानिमित्त झी स्टुडीओने त्यांच्या नव्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट एक मूकपट असून याचे नाव ‘गांधी टॉक्स’ असे आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपथी, अरविंद स्वामी आणि अभिनेत्री आदिती राव हैदरी यांच्यासोबत मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर गांधी जयंतीनिमित्त प्रदर्शित केला गेला आणि प्रेक्षकांनी याला चांगली पसंती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

या टीझरमध्ये नीट पाहिले तर समजेल कि, यातील सर्वांकडे पैसे आहेत. कुणाच्या तोंडात, कुणाच्या डोक्यावर पैसे चिकटवलेले आहेत. यावरून समजते कि हा चित्रपट पैशांवर आधारित आहे. हा एक लघुपट असून कोणत्याही संवादाशिवाय तयार करण्यात आलेला मूकपट आहे. जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर यांनी केले आहे. तर झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मूव्ही मिल एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती आहे. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे. त्यामुळे हा चित्रपट अत्यंत खास आणि लक्षवेधी ठरणार आहे.

Tags: Instagram PostOfficial TeaserSiddharth JadhavVijay SethupatiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group