हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमेझॉन प्राईम व्हिडिओवर १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित झालेला ‘शेरशाह’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट आहे. चित्रपटातील एक एक पात्र लोकांच्या मनाला चांगलेच भिडले आहे. त्यामुळे चित्रपटाचे कथानक, चित्रीकरण, अभिनय आणि मुख्य म्हणजे वास्तविकता यांनी प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले आहे.
सध्या चित्रपटाने लोकांची मने जिंकली आहेत आणि त्यामुळे कौतुकाचा जणू पाऊस पडत आहे. तसेच चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाची चाहते आणि समीक्षक यांनी विशेष दाखल घेतली आहे आणि कौतुकही केले आहे. सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी ‘शेरशाह’ हा एक चित्रपट आहे, असे अनेकजण म्हणत आहेत. सध्या ‘शेरशाह’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यामुळे ‘शेरशाह’ या संपूर्ण वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
‘शेरशाह’ चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले आहे. तर निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली आहे. करण जोहरचा हा अॅमेझोन प्राइमसोबतचा पहिलाच प्रोजेक्ट असून या पहिल्याच प्रोजेक्टने अगदी धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी व्यतिरिक्त शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद्य, शाताफ फिगर आणि पवन चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत.
Discussion about this post