Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘होऊ दे धिंगाणा’; अमृताच्या ‘चंद्रा’ गाण्यावर थिरकण्याचा मोह सिद्धूलाही झाला अनावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 22, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
143
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने अनेक रेकॉर्डस् मोडत बॉक्स ऑफिसवर जादू केली. तर या चित्रपटातील गाण्यांनी तर त्याहूनही मोठी मजल मारली आहे. या चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणे तर इतके गाजले कि काही बोलायचं काम नाही. या गाण्यावरील अमृताचा परफॉर्मन्सदेखील प्रेक्षकांना इतका भावला कि अमृता मंचावर दिसली आणि ती थिरकली नाही तर काय मजा.. म्हणूनच स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात चंद्रा पोहोचली आणि थिरकलीसुद्धा..

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आता होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रम अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झाला असून याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधव करतो आहे. एकीकडे सिद्धूचं खुमासदार होस्टिंग आणि दुसरीकडे कलाकारांचा म्युझिकल कल्ला. यामुळे कार्यक्रमाची रंगत दिवसागणिक वाढताना दिसते आहे. या आठवड्यात या कार्यक्रमाच्या मंचावर ‘लग्नाची बेडी’ आणि ‘अबोली’ या मालिकांच्या टीम सहभागी झाल्या आहेत. या भागाची विशेष बाब म्हणजे या दोन्ही टीमचा उत्साह वाढवण्यासाठी या मंचावर ‘चंद्रमुखी’ सिनेमाची टीम अवतरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

येत्या रविवारी २५ सप्टेंबर २०२२ रोजी ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर पहायला मिळणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता आदिनाथ कोठारे आणि डॉली म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर हजेरी लावली. दरम्यान ‘अबोली’ टीमसाठी अमृता तर ‘लग्नाची बेडी’ टीमसाठी आदिनाथ आणि मृण्मयीने साथ दिली. या खास भागात अमृताने सिद्धार्थ जाधवलाही ‘चंद्रा’ गाण्यावर ठेका धरायला भाग पाडलं. तर ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील राघव अर्थात संकेत पाठकने अमृतासोबत सालसा सादर केला. येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर हे भाग प्रसारित होणार आहेत.

Tags: Amruta Khanvilkarata Hou De DhinganaInstagram PostSidharth Jadhavstar pravahViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group