Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सिद्धार्थ- कियाराची लगीनघाई; राजस्थानच्या जैसलरमध्ये होणार शाही विवाह सोहळा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Siddharth_Kiara
0
SHARES
97
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील बहुचर्चित कपलं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या बातमीने त्यांचे चाहते प्रचंड खुश आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर या जोडप्याच्या रिलेशनशिपची, ब्रेकअपची आणि अगदी लग्नाची चर्चा एकदम जोरदार सुरु होती. पण तरीही सिद्धार्थ किंवा कियाराने याबाबत कोणतीही माहिती देण्याची तसदी घेतली नाही. यानंतर आता अखेर त्यांच्या लग्नाची उघड माहिती समोर आली असून येत्या दोन दिवसात राजस्थानमध्ये हि रिल लाईफ जोडी रिअल लाईफ जोडी होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे येत्या ​​६ फेब्रुवारी २०२३ रोजी, रविवारी लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये लग्नाची लगबग सुरु आहे आणि वऱ्हाडं जैसलमैरला रवाना झालं आहे. कियारा तिच्या पूर्ण कुटुंबासोबत कलिना विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी, अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या जंपसूटमध्ये दिसली. सोबत तिने गुलाबी शाल देखील घेतली होती.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध मेहंदी कलाकार वीणा नागदा कियाराची वेडिंग मेहंदी काढणार आहे. तिने एक फोटो पोस्ट करत ती राजस्थानला रवाना झाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हातावर मेहंदी लावली आहे. या जोडप्याच्या लग्नाला त्यांचे कुटुंबिय आणि इंडस्ट्रीतील अनेक मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत.

Tags: Instagram Postkiara advanisiddharth malhotraViral VideoWedding Vibes
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group