हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही एकदम जोरात चालते. बॉलिवूड म्हणजे नेपोटिझमचा अड्डा. इथे खूप पप्पू, अपलू- टपलू नेपोटीझममुळे मोठे झाले. अशी विधाने तुम्ही अनेकदा ऐकली असाल. कारण बॉलीवूडला नेपोटीझमचा श्राप आहे. ज्यावर वारंवार बोललं जात. यामुळे अनेक चांगल्या आणि दर्जेदार कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळत नाही. यावर बोलताना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने मात्र अतिशय वेगळा दृष्टिकोन मांडला आहे.
घराणेशाही, नेपोटीझम यावर गेली कित्येक वर्ष इंडस्ट्रीमध्ये वाद सुरु आहेत. पण सिद्धार्थ मल्होत्राने यांवर वेगळी आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यामुळे सगळेच प्रश्नात पडले आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला कि, ‘जेव्हा तुम्ही बॉलीवुडमध्ये बाहेरून येता, तुम्हाला कुणाचाही पाठिंबा नसतो तेव्हा येणाऱ्या आव्हानांबद्दल बोलेन तेव्हढं कमीच. वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्यासोबत मी जेव्हा करण जोहर यांच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून २०१२ मध्ये पदार्पण केले तेव्हाचा माझा प्रवास सोप्पा नव्हता. स्टुडंट ऑफ द इयर’ पासून सुरु झालेला माझा प्रवास आजही बॉलीवुड सिनेइंडस्ट्रीत सुरूच आहे. कारण माझ्यासाठी एखादा चित्रपट मिळवणे कधीच सोपे नव्हते आणि याचे कारण म्हणजे माझ्या कुटुंबातील कोणीही मनोरंजन विश्वात कार्यरत नाही.’
पुढे म्हणाला, ‘मला आनंद आहे कि, लोकांना मी केलेल्या भूमिका आणि माझे चित्रपट आवडत आहेत. म्हणूनच त्यांनी आजपर्यंत मला नाव ठेवलेली नाहीत. सिने इंडस्ट्रीत नवीन येणाऱ्या व्यक्तीला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम हेच नेहमी तारुन नेते. कारण करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या हातात काहीच नसते. तुमचा चित्रपट चालेल की नाही यावर कोणाचेच नियंत्रण नसते. तुम्ही फक्त तुमचा सीन आणि शॉट्स व्यवस्थित देण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.
एवढे करूनही जेव्हा चित्रपट चालत नाही तेव्हा माध्यमांनी बनवलेली मते मनात खोल जातात. पण अशावेळी जिद्द, चिकाटी आणि सातत्य हि वृत्ती गरजेची आहे. कारण जो प्रयत्न करणे थांबवत नाही त्याला हरवणे फार कठीण असते.’ येत्या काळात सिद्धार्थ मल्होत्रा सध्या अजय देवगण आणि दिशा पटानी यांच्यासोबत ‘थँक गॉड’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
Discussion about this post