हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | स्लमडॉग मिलियनेअरमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याविरोधात पोलिसांनी विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारीला त्याच्या एका महिला मैत्रिणीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. मधुर मित्तल असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी स्लमडॉग मिलियनेअर या चित्रपटात काम केले आहे.
मारहाण करुन जखमी करणे आणि लैंगिक अत्याचार या आरोपांखाली मधुरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवसा अगोदर मधुर आणि या तरुणीचे ब्रेकअप झाले होते. 11 फेब्रुवारी रोजी त्यांनी ब्रेकअप केले होते. परंतू, त्यानंतर 13 फेब्रुवारीला मधुरने तरुणीच्या घरात घुसून तिला मारहाण केली, असं तरुणीच्या वकिलांनी सांगितलं.
मधुर खूप जास्त रागात होता त्यामुळे कोणाशीही न बोलता तो थेट तिच्या घरात घुसला आणि त्याने पीडितेची मान पकडून तिच्या कानाखाली लावल्या. तसंच तिचे केस, कान ओढले. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post