Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरील वादात मराठमोळ्या पारूची एंट्री; अभिनेत्रीला सल्ला देत म्हणाली..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 17, 2022
in Trending, गरम मसाला, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
221
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ प्रचंड ट्रोलिंगचा सामना करत आहे. याचे कारण ठरतेय दीपिका पदुकोणची भगवी बिकिनी. होय. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाने परिधान केलेली भगवी बिकिनी सध्या मोठ्या वादाचं कारण ठरत आहे. या बिकीनीमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप लावला जात आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर बॉयकॉट पठाण असा ट्रेंडदेखील सुरु झाला आहे. दरम्यान मराठी इंडस्ट्रीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री स्मिता गोंदकरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली कि, ‘हा जो काही रंगाचा वाद सुरु आहे त्यानंतर मला खरंच भीती वाटू लागली आहे. मी तर पहिल्यांदा माझं वॉर्डरोब चेक केलं आणि त्यात माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही नाही ना हे आधी पाहिलं. आता तर भगव्या रंगाची ब्रा घालण्याचे देखील दडपण येईल.

View this post on Instagram

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

चुकून कुठे कुणाच्या नजरेस पडली तर आपलं काय करतील हे लोक याचा विचारही करून भिती वाटतेय. ज्या भगव्या रंगावरनं वाद सुरु केलाय, हिंदू धर्माचा पवित्र रंग म्हणून बोललं जात आहे मग याबाबतीत मी दीपिकाला सल्ला देईन की तिनं सरळ हिरव्या रंगाच्या हॉट बिकिनीत स्वतःचा फोटो पोस्ट करावा म्हणजे प्रश्नच मिटेल.’

View this post on Instagram

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar)

‘खरंतर आता जग पुढे चाललंय. ग्लोबलायझेनमुळे पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढतोय, पण त्याहूनही अधिक आता आपण हवामान बदलतं तसे कपडेही घालतो. मग हा तर सिनेमा आहे… जागतिक स्तरावर तो पाहिला जातो आणि सिनेमातील प्रसंगाची गरज ओळखून कलाकारांना कपडे घालावे लागतात… आणि जर ते सुंदर दिसत असतील तर का घालू नयेत. कुठे ते चांगले दिसले नसते तर प्रश्न वेगळा होता. पण उगाचच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं जो वाद सुरु आहे तो मला काही पटलेला नाही’.

Tags: Dipika PadukoneInstagram PostPathanSmita GondkarViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group