हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीची चावडी खरंतर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते. पण यंदाचे स्पर्धक उठ सुठ शो होस्ट महेश मांजरेकरांवरचं आवाज चढवताना आणि आगाऊपणा बोलताना दिसतात. पण या चावडीत मांजरेकरांनी सगळ्यांशी गोड बोलून सगळ्यांची जिरवली. यानंतर सगळ्यांनाच तव्यावर ठेवणारा क्षण म्हणजेच एलिमिनेशन. तर यावेळी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर एव्हिक्ट झाली.
अनेक प्रेक्षकांनी आधीच स्नेहलता वसईकरचं घराबाहेर पडणार असा पक्का शेरा मारला होता. कारण तिच्यासोबत नॉमिनेट झालेले सदस्य हे तिच्या तुलनेने अत्यंत तोडीचे होते. स्नेहलताने घरात वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री केली आणि तिने आपल्यापासून घर गाजवलं. ती चांगली खेळत होती, बोलत होती, वागत होत पण उशिरा घरात एंट्री करून ती टिकू शकली नाही. जवळपास चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर तिला बिग बॉसच्या खेळातून बाहेर व्हावे लागले. यावेळी घरातील सदस्य अपूर्वा नेमळेकर प्रचंड भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
आतापर्यंत बिग बॉस मराठीचं घर विविध भांडणे, विविध दंगे, विविध राडे यांनी गाजल्याचे आपण पहिले. या आठवड्यात तर कोणचं कोणापेक्षा कमी नाही हे दिसून आलं. एकीकडे राखीचं वागणं, तर दुसरीकडे अक्षय – प्रसादचं भांडणं इतकचं काय तर तिसरीकडे अपूर्वा विकासची खडाजंगी आणि प्रसाद- अमृतामध्ये बाचाबाची या सगळ्या घटनांनी हा आठवडा गाजला. पण शेवटी स्नेहलताच्या एव्हिक्शनंतर घर थोडं भावुक झाल्याचे दिसले. आता या आठवड्यात हे सदस्य काय राडा घालणार हे पाहण्यासाठी बिग बॉस मराठी सीजन ४ जरूर पहा.
Discussion about this post