हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट प्रकरण चांगलंच गाजल्याचे आपण पाहिले. एका मॅगझिनसाठी त्याने हे फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कापड नव्हतं. ज्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला होता. या फोटोशूटमुळे रणवीरला नामुश्कीस सामोरे जावे लागले होते. शिवाय त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर बराच काळ सोशल मीडियावर रणवीर ट्रोल होताना दिसला. याप्रकरणी आज त्याने पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या फोटोशूटसोबत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे.
Nude photoshoot controversy | Mumbai Police recorded the statement of actor Ranveer Singh in the nude photoshoot case on Aug 29. As per information accessed now, the actor in his statement has claimed that someone has tampered with and morphed one of the photos of the actor. https://t.co/7rtuPiL9Mh
— ANI (@ANI) September 15, 2022
अभिनेता रणवीर सिंगने आज पोलिसांसमोर जबाब नोंदवताना म्हटले आहे की, सात फोटोचं एक कॉन्ट्रॅक्ट मी एका मासिकासोबत केलं होतं. फोटोशूट झाल्यानंतर हे सात फोटो लगेच पब्लिश होणार नव्हते. पण त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामधील एक फोटो हा मॉर्फ केलेला आहे. मी कॉन्ट्रॅक्टमध्ये याची खबरदारी घेतली होती की, फोटोशूटमध्ये कोणतेही अश्लिल कृत्य किंवा कोणाच्या भावना या फोटोशूटमुळे दुखावल्या जाणार नाहीत. पण ज्या फोटोमुळे गुन्हा दाखल झाला आहे तो फोटो जसा आणि ज्या पद्धतीने दाखवला गेला आहे तो मुळात तसा शूट केलेलाच नव्हता. तर तो मॉर्फ केला गेला आहे, असा दावा रणवीर सिंगने केलाय. तूर्तास रणवीरने नोंदवलेल्या या जबाबाची पोलीस त्यांच्या पद्धतीने पडताळणी करत आहेत.
सूत्रांनुसार, रणवीरने मुंबई पोलीसांना दिलेल्या जबाबात त्याच्या फोटोंसह छेडछाड झाल्याचा त्याचा दावा खरा ठरल्यास त्याच्यावरील सर्व गुन्हे खोटे ठरतील आणि त्याला क्लिन चीट मिळेल. रणवीरवर न्युड फोटोशुटप्रकरणी २६ जुलै २०२२ रोजी अश्लील प्रदर्शन केल्याच्या आरोपाखाली तक्रार करण्यात आली होती. मात्र व्हायरल झालेले न्युड फोटो रणवीरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अपलोड झालेले नाहीत असं त्याने म्हटलं आहे. चालू तपासानुसार, जे सात फोटो रणवीरने इंस्टावर शेअर केले आहेत ते अश्लील नसून त्यामध्ये त्याने अंडर गारमेंट घातल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. शिवाय पोलिसांनी तपास केल्याप्रमाणे, ज्या फोटोमुळे रणवीरवर गुन्हा दाखल झाला त्याचा समावेश या पोस्टमध्ये नाही. यामुळे रणवीरला लवकरच क्लीन चिट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Discussion about this post