Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

इश्श.. मार डाला! अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एथनिक रॉयल लूक सोशल मीडियावर व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonakshi Sinha
0
SHARES
8
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड इंडस्ट्रीची दबंग गर्ल अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हटके अंदाज, रोखठोक बोली आणि अप्रतिम सौंदर्यामुळे सोनाक्षी तिच्या इन्स्टा प्रोफाईल सारखीच असली सोना आहे. सोनाक्षी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि यामुळे चाहत्यांच्या नजरेत येण्याची एकही संधी ती सोडत नाही. सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिने नेटकरी आणि चाहत्यांच्या नजरा ओढून घेतल्या आहेत. नेहमीच हटके स्टाईलमध्ये दिसणारी सोनाली आज चक्क एथनिक डिझाईनर वेअरमध्ये दिसली आहे. तिने हे फोटो आणि शुटवेळी तयार केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. तिच्या मोहक अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाचा भरजरी अनारकली सूट परिधान केला आहे. सोबतच त्याला साजेसा मेकअप, दागिने, हेअर स्टाईल करत तिने हा शाही लूक पूर्ण केला आहे. तिचा हा एथनिक लूक अत्यंत मोहक, आकर्षक आणि लक्षवेधी आहे. केसांची लांब वेणी आणि गर्रकन गिरकी घेत केलेली अदाकारी सगळ कसं परफेक्ट. मुख्य म्हणजे सोनाक्षी या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे आणि तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे. अनेकांनी यावर कमेंट करीत तिच्या लुकसह तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

याआधी देखील असे अनेक फोटोशूट सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याआधीही तिचा पारंपारिक लूक सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये तीने पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेस परिधान केला होता. मुख्य म्हणजे, ती फक्त एथनिक लूकमध्येच नव्हे तर वेस्टर्न लूकमध्येही कमालीची देखणी दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा ती कहर करताना दिसते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सोनाक्षी शेवटची ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर आता ती ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’मध्ये दिसणार आहे.

Tags: Bollywood ActressInstagram Postsonakshi sinhaViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group