हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या हटके स्टाईलसाठी प्रचंड चर्चेत असते. सध्या सोनाक्षी तिचा आगामी चित्रपट डबल एक्सएल मूळे फारच चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच या दोन तोडीच्या अभिनेत्री एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
दरम्यान या चित्रपटासाठी सोनाक्षीने तब्बल २० किलो वजन वाढविले होते. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणून तो तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास असणार आहे. दरम्यान प्रमोशन साठी सोनाक्षी विविध लूकमध्ये दिसते आहे. त्यातील एक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असते. त्यामुळे अनेकदा ती विविध पेहरावातील विविध लूक केलेले फोटो आपल्या चाहत्यान शेअर करणारे पसंत करते. याहीवेळी तिने असाच एक नवा आणि लक्षवेधी लूक शेअर केला आहे. मुख्य म्हणजे या लूकमध्ये सोनाली कमालीची दिसते आहे आणि यामुळे चाहते सुद्धा उफ्फ म्हणत घायाळ झाले आहेत. सोनाक्षीचा आगामी चित्रपट डबल एक्सएल च्या प्रमोशनवेळी तिने हा लूक केला होता. ज्याचं तिने जबरदस्त फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये सोनाक्षी एकदम जबरदस्त दिसते आहे. तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये सोनाक्षीने अत्यंत कमी पण आकर्षक शॅडो मेकअप केला आहे. सोबतच तिने केलेले नेलआर्ट या लुकला आणखीच लक्षवेधी बनवीत आहे. सोनाक्षीने हे फोटोशूट करताना दिलेल्या पोजेस नेटकऱ्यांच्या जीवाचे आणखीच हाल करत आहेत. सोनाक्षीचा हा पूर्ण लूक तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना भावला आहे.
Discussion about this post