हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत सफरीवर गेली आहे. हि सफर तिला तिच्या आजोळी घेऊन गेली आहे. मुख्य म्हणजे सोनालीची आई अर्थात सावी कुलकर्णी यांचं माहेर पंजाबमधील अमृतसर आहे. त्यामुळे साहजिकच सोनालीचं या ठिकाणाशी मायेचं नातं आहे. आपल्या आजोळी ती तिच्या नव्या कुटुंबासह गेली आहे. आता अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात गेली नाही असे कसे होईल. म्हणूनच ती संपूर्ण कुटुंबासोबत सुवर्ण मंदिरात पोहोचली आणि माथा टेकत तिने आशीर्वाद घेतला. यावेळचे तिने काही फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोनालीने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘आईचं माहेर, आमचं आजोळ अमृतसर असल्यामुळे लहानपणापासून अगदी दरवर्षी यायचो सुवर्ण मंदिरमध्ये… मग पुढे कॅालेजपासून दोन वर्षांतून एकदा…आणि मग पुढे ही gap वाढतंच गेली… यंदा साधारण ६- ७ वर्षांनी आलोय अमृतसरला … पण यंदाची सुवर्ण मंदिराची फेरी ही खास आहे… कुणाल आणि संपूर्ण बेनोडेकर कुटुंब पण आमच्या बरोबर आहे. आजही या वास्तूबद्दलची श्रद्धा आणि आकर्षण तेव्हढंच आहे.. इथे सगळे समान… कोणत्याही व्हीआयपी लाईन्स नाहीत, कोणतेही विशेषाधिकार नाहीत, २४ तास लंगर.. (मला माहित आहे की प्रत्येक #गुरूद्वारा हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि स्वयंसेवी सेवा देते… पण हे पाहणे खरोखर आश्चर्यकारक आहे).’ यासोबत वाहेगुरू, एक ओंकार, रब्बाराखा असे हॅशटॅग देखील तिने दिले आहेत.
यावेळी सोनालीने अतिशय सुंदर असा वेल्वेट मरून रंगाचा लेगीज टॉप परिधान केला आहे. तर कुणालने छापील राखाडी कुर्ता आणि जीन्स परिधान केली आहे. मंदिराच्या परंपरेनुसार, सोनाली आणि कुणाल या दोघांनीही धार्मिक कापडाने आपले डोके झाकले आहे. या पोस्टमध्ये तिने मंदिराच्या आवारातील प्रसिद्ध लंगरमधील जेवण तयार करण्याच्या प्रक्रियेची झलक शेअर केली आहे. जिथे काही महिला कामगार चपात्या बनवताना दिसत आहेत. सोनालीच्या या फोटोंवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्र मैत्रिणींनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Discussion about this post