Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठी सिनेविश्वाची अप्सरा देशाबाहेरही जपतेय संस्कृती; तुर्कीत केलं साडीमध्ये फोटोशूट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 2, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
72
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर नेहमीच तिच्या विविध पेहरावातील लूक आणि फोटोंसाठी चर्चेत असते. मुळातच सुंदर दिसणारी सोनाली आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध लूकमधील फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सोनाली तिचा नवरा कुणालसोबत तुर्की दौऱ्यावर आहे. गेले महिनाभर ती तुर्कीमधील सुंदर फोटो पोस्ट करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

नुकतंच सोनालीने तुर्कीमध्ये एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी तिने साडी परिधान केली आहे आणि यामागील कारण तिने सांगितले. मराठी सिनेसृष्टीच्या अप्सरेने तुर्कीतील लोकप्रिय ‘बलून कॅपाडोसिया’ या जागेला भेट दिली आणि हे फोटोशूट तिथेच केले आहे. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘बलून कॅपाडोसिया ही जागा फोटोशूटसाठी खूप लोकप्रिय आहे. जगभरातून असंख्य लोक इथे खास फोटो काढण्यासाठी येतात. मॉडेल्स, नववधू त्यांच्या फोटोशूटसाठी, विंटेज कार आणि फ्लोइंग गाऊन भाड्याने घेतात’.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

पुढे लिहिले आहे कि, ‘मी सुद्धा या जागेला भेट देत सुंदर फोटो काढले आहेत. या ठिकाणी मी आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारी साडी नेसली होती. अनेक लोक इथे आल्यावर लांब ड्रेस घालतात परंतु, माझ्याकडे फोटोशूट करताना ड्रेसच्या लांब ट्रेलऐवजी साडीचा हा लांब पदर होता’. सोनालीचे हे फोटो आणि या पोस्टचे कॅप्शन सोशल मीडियावर भारी चर्चेत आले आहे. अनेकांनी ती तुर्कीमध्येही भारतीय संस्कृती जपते आहे हे पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Tags: Instagram PostMarathi Actresssonalee kulkarniViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group