Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘एव्हढी सुंदर दिसू नको दृष्ट लागेल’; जरतारी पैठणीत अवतरली मराठमोळी ‘अप्सरा’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
174
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या हसण्यात, बोलण्यात प्रत्येक हालचालीत एक जादू आहे जी नेहमीच सोशल मीडियावर चालते. तिचं सौंदर्य चाहत्यांना संमोहित करतं आणि अशा अनेक विकेट ती वारंवार घेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली अनेकदा तिचे विविध फोटो शेअर करते. कधी पारंपरिक, कधी ऐतिहासिक तर कधी ग्लॅमरस. यावेळी तिने शेअर केलेला लूक हा अतिशय साधा मात्र लक्षवेधी आहे. तिच्या पदरावर असणारा मोर अनेकांची मनं चोरी करतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हे फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. यासोबत तिने अतिशय गोड अशा पंक्ती कॅप्शनमध्ये शेअर केल्या आहेत. यात तिने लिहिले आहे कि, ‘मावळती चंद्रकोर ती’, ‘रानफुलाने मोहित झाली’, ‘निमुळत्या पाकळ्यांनी झुपके’, ‘दवात भिजुन चंद्र प्याली’. सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने जरतारी पैठणी परिधान केली आहे. सोबत कपाळावर चंद्रकोर लावली आहे. मोकळे केस, साजेसा मेकअप आणि गळ्यात सौभाग्याचं प्रतीक अर्थात मंगळसूत्र. तिचा हा लूक अतिशय सामान्य सौभाग्यवती स्त्रियांसारखा आहे. त्यामुळे कोणत्याही भपकेबाजीशिवाय सोनालीचे सौंदर्य भुरळ घालत आहे.

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तिचे चाहते तिचा हा लूक पाहून फारच आनंदी झाले आहेत. कुणी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे तर कुणी तिच्या साज शृंगाराचे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘अस्सल मराठी सौंदर्य’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘एव्हढं सुंदर दिसू नका मॅडम.. दृष्ट लागेल’.

आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘खरंच एक स्त्री साडीमध्ये किती सुंदर दिसते ना. म्हणूनच मराठी स्त्रीला साडीमध्ये पाहून खूप सुंदरता शोभून दिसते…मला तर खूप आवडते…’. इतकंच नव्हे तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘आज कुणाल भाऊ काही जेवण करत नाहीत.. तुम्हाला बघून पोट भरेल त्यांचं’.

Tags: Facebook PostInstagram PostMarathi Actresssonalee kulkarniViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group