हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि सुंदर, सालस, आकर्षक, मोहक अशी कितीतरी विशेषणे कमी पडतील इतकी सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिच्या विविध पेहरावातील फोटो नेहमीच ट्रेंडिंगवर असतात. सोनाली स्वतः सुद्धा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच आपल्या चाहत्यांसह विविध लूक शेअर करताना दिसते. यावेळी तिने ट्रेंडी पेहरावातील तिचा नवाकोरा लूक शेअर केला आहे. तिचा हा मोहक अंदाज तिच्या चाहत्यांना भारी भावला आहे.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर हे फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये सोनालीने डार्क व्हायोलेट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर फुलांचे नक्षीकाम आहे.
सोबतच टॉपचे बलून स्लिव्हस सोनालीचा लूक आणखीच लक्षवेधी बनवीत आहेत. या ड्रेससोबत एक कंबरपट्टा देखील आहे ज्यामुळे ड्रेसचा लूक आणखीच उठून आला आहे. या ड्रेसमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसते आहे. शिवाय सोनालीने या ड्रेसमध्ये फोटोशूट करताना चांगल्या नखरेल पोझ दिल्या आहेत. ज्या पाहून कुणीही घायाळ होऊ शकत.
सोनालीचं हे नवंकोरं फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांनी तर या फोटोशूटवर प्रेमाचा नुसता वर्षाव केला आहे. सोनालीच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर फायर ईमोजी आणि हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनालीचा हा लूक डान्स महाराष्ट्र डान्स या शोच्या फिनाले सोहळ्यादरम्यानचा आहे. सोनालीचे असे अनेक लूक सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड करत असतात.
Discussion about this post