हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी. सोनाली नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. याचे कारण म्हणजे ती सोशल मीडियावर सक्रिय राहणे पसंत करते. याच माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते. नवनवीन ट्रेंड, व्हायरल व्हिडीओसह ती आपल्या खाजगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. यावेळी तिने शेअर केलेली पोस्ट जरा खास आहे. पारंपरिक पिढीची स्टाईल थोड्या वेगळ्या ढंगात तिने यावेळी प्रेसेंट केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने पारंपरिक खण साडी थोड्या आधुनिक पद्धतीने परिधान केली आहे. हि पोस्ट शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, कोणं म्हणतं आपली खण साडी फक्त पारंपारिक पद्धतीनेच शोभून दिसते. हा आहे पारंपारिक पण समकालीन देखावा – “सतरंगी चिक्की खण साडी”. हे आमचे पारंपारिक विणकाम आहे, खूप जुने पॅटर्न आहे, ज्यामध्ये सर्वत्र विविधरंगी लहान सूर्यफूल विणलेले आहेत.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करीत असते. तिच्या सोशल लाईफमध्ये सक्रिय राहण्यामुळे तिचा मोठा असा चाहता वर्ग आहे.
https://www.instagram.com/p/CdqWtrdDoIv/?utm_source=ig_web_copy_link
यामुळे सोनालीने शेअर केलेली पोस्ट हि नेहमीच चर्चेत असते. याआधी तिने आपल्या हनिमूनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
यावेळी तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहून नेटकरी अक्षरशः भारावले होते. यानंतर हनिमून एन्जॉय करून सोनाली परतल्यानंतर जेव्हा सासरच्या मंडळींची सेवा करताना दिसली तेव्हा नेटकऱ्यांनी तिच्या परदेशात असूनही परंपरा जपण्याच्या स्वभावाची वाहवाह केली होती.
Discussion about this post