Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आमचं काम हाच आमचा खरा धर्म’; सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 27, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
65
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह दिवाळीचे खास क्षण शेअर केले आहेत. हा दिवाळीचा सण अनेकांच्या आयुष्यात नवे पर्व, नवी उमेद, नवी आशा आणि जगण्याची नवी दिशा घेऊन आला आहे. कुणी नवं घर घेतलं, कुणी नवी गाडी. तर कुणी आपापल्या संसारात मग्न आहेत. अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील आपल्या पतीसोबत यंदा स्वतःच्या घरात दिवाळी साजरी केली. याचे फोटोही तिने शेअर केले आहेत. सोबतच तिने छत्रपती ताराराणी चित्रपटातील लुकचा फोटो शेअर करत एक अत्यंत लक्षवेधी पोस्ट लिहिली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णीने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे कि, शुभ पाडवा ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” या चित्रपटाच्या चित्रीकरणातून चार दिवस सगळ्यांना दिवाळी ची सुट्टी दिली होती, आज सगळे परत कामावर रूजू झाले… कारण स्वराज्याने हाक दिलीये… खरंतर आनंद होतोय कारण याच पावन कार्याने वर्षाची सुरूवात होत आहे…आमचं काम हाच आमचा खरा धर्म …आणि वर्षभर याच कामातून समाधान मिळत राहो!’

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हि पोस्ट जितकी शुभेच्छापूर्वक आहे तितकीच सूचक देखील आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांसह कौतुकाचा वर्षाव केला आहे. माहितीनुसार, सोनाली कुलकर्णी ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात ती ताराराणी यांची भूमिका साकारते आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून हि भूमिका सोनालीसाठी अत्यंत मोठी जबाबदारी आहे. यामुळे चित्रपटाबाबत एक वेगळी उत्सुकता सोनालीच्या मानातदेखील तेवत आहे.

Tags: Diwali 2022Instagram PostMarathi ActressMogalmardini Chhatrapati Tararanisonalee kulkarniviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group