हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मनोरंजन विश्वात अप्सरा म्हणून ओळखली जाते. याचे एकमेव कारण म्हणजे तिचे मोहक हास्य आणि लक्षवेधी सौंदर्य. सोनाली सोशल मीडियावर इतर सेलिब्रिटींप्रमाणे प्रचंड सक्रिय असते. यामुळे अनेकदा आपले विविध अंदाजात फोटो तसेच व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून तिचे चाहते लट्टू झाले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहेमीच आपापल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो, व्हिडीओ, लूक आणि आगामी प्रोजेक्ट्ची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकतेच सोनाली कुलकर्णीने शेअर केलेले साडीतील फोटोशूट हे नेहमीप्रमाणे प्रचंड व्हायरल होत आहे. मुळातच सुतळी प्रचंड सुंदर दिसत असल्यामुळे कोणत्याही भडक मेकअपशिवायदेखील ती सुंदर दिसते. या फोटोंमध्ये सोनालीने सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. सोबतच मोकळे केस, हलका मेकअप आणि कातिलाना स्माईलसह तिचा लूक पूर्ण होत आहे.
या लूकमध्ये सोनाली खरोखरंच एखाद्या अप्सरेसारखी भासतेय. तिने हे फोटो ‘जागतिक साडी दिवस’निमित्त शेअर केल्यामुळे याचे कॅप्शनही हटके आहे. तिने लिहिलंय कि, ‘आज जागतिक साडी दिवस साजरा करत आहे.. जेव्हा मी साडी नेसते…ते कायापालट असते. ती मला जे लालित्य देते ते शब्दांच्या पलीकडे असते. ती माझं स्त्रीत्व वाढवते. ती मला एकाच वेळी कामुक आणि दैवीय दर्शवते ! माझी सखी, माझी साडी..’
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी विशेष पसंती दिली आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट करताना ‘ब्युटीफुल’, ‘अप्सरा..’, ‘अतिशय सुंदर’ शिवाय बहुगुणी विशेषणांसह फायर ईमोजी आणि हार्ट इमोजी शेअर करण्याची कोणतीच कसर सोडलेली नाही. काहींनी तर ‘सौंदर्य असावे तर असे.. ‘ असेही म्हटले आहे. तर अन्य एका नेटकऱ्याने असे म्हटले आहे कि, ‘सौंदर्य म्हणजे काय असतं.. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तू..’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘काय लिहिलं ते समजलं नाही, पण गोड दिसतेस.. एकदम अप्सरा’
Discussion about this post