हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची आघाडीची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध फोटो, विविध लूक, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती शेअर करत असते. सध्या सोनाली संपूर्ण महाराष्ट्र फिरताना दिसते आहे. ‘महाराष्ट्र ऑन माय लिप्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी भ्रमंती करताना दिसते आहे. या कार्यक्रमात ती कुणाल विजयकर यांच्यासोबत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या परंपरा, तेथील स्वाद आणि कथांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवते आहे. या दरम्यान ती अमरावती जिल्ह्यातील अंबा देवीच्या दर्शनासाठी पोहोचली होती आणि यावेळी तिने गोंधळींसोबत मंदिरासमोर गोंधळात सहभाग घेतला.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील अंबा देवीच्या प्राचीन मंदिरात देवीसमोर नतमस्तक झाली. देवीच्या आख्यायिकेची माहिती करून घेत तिने मनोभावे देवीसमोर नमस्कार केला. इतकेच काय तर मंदिरासमोर गोंधळी भक्तिरसात तल्लीन होत गोंधळ घालत होते. यावेळी सोनालीने अगदी उत्स्फूर्तपणे त्यांच्यासोबत ताल धरला आणि गोंधळात सहभाग घेतला. देवीच्या स्तुतीसह तिने गोंधळींच्या उत्साहात भर घातली. यावेळी तिच्यासह अन्य काही स्त्रियांनीदेखील गोंधळात सहभाग घेतला. एकंदरच हा भक्तिरसात तल्लीन झालेला माहोल सोनालीने एन्जॉय केला.
सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. एकाने या व्हिडिओवर लिहिले आहे कि, ‘कोणालाही नलाजता सर्वांच्यात मिळून मिसळून आनंद व्यक्त करणे जे काय पण आहे ते सर्वांच्या समोर ही गोष्ट मला खूप जास्त आवडते तुझ्यामधली’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘तुमच्यासारख्या मराठी कलाकरांमुळेच आपली मराठी संस्कृती कायम आहे’. सोनालीने दर्शन घेतलेलय अंबा देवी देवस्थानाबद्दल सांगायचे तर, हे मंदिर इ.स. १८७० हैद्राबाद गॅझेटीयर नुसार हजारो वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पुर्वार्धात अंबा देवीची मुर्ती एका लहानशा हेमाडपंथी मंदिरात होती असे आधीचे लोक सांगत. अगोदरचा इतिहास काळाच्या उदरात गडप झाल्याने याची कल्पना येत नाही. देवीची मुर्ती वालुकेची आहे. या मंदिरातुनच भिष्मकपुत्री रुक्मिणीचे श्रीकृष्णाने हरण करून पाणी ग्रहण केल्याची पूर्वापार चालत आलेली मान्यता आहे.
Discussion about this post