Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पांडू’ची उषा ठरली ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’; सोनालीने फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती अशी की, सोनालीने ‘पांडू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळवला आहे. नुकताच ‘ झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२ ‘ हा मानाचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेक मराठी चित्रपट आणि कलाकारांनी विविध श्रेणीत नामांकने मिळवली होती. यांपैकी काही चित्रपटांनी आणि कलाकारांनी बाजी मारत महत्वाच्या पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. यांपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराविषयी आनंद व्यक्त करत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि सोबत प्रेक्षकांचे आभरदेखील मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये टीम पांडू सोबतचे काही फोटो आणि पुरस्कार मिळालेले मानचिन्ह हाती घेऊन काही फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमदध्ये लिहिलं की, ‘Zee talkies Comedy – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – पांडू. तसेच पांडू ने जिंकले तब्बल 8 पुरस्कार…. धन्यवाद @zeetalkies #jury आणि अर्थातच, तुम्ही सगळे मायबाप रसिक प्रेक्षक, कारण “प्रेक्षक पंसतीचे” २ महत्त्वाचे पुरस्कार तुमच्याच प्रेमामुळे मिळाले आहेत.
० सर्वोत्कृष्ट सिनेमा – #पांडू
० सर्वोत्कृष्ट गीत – #बुरूमबुरुम
या पुरस्कार सोहळ्यात सोनालीने लाल रंगाची डिझायनर फ्लोरल साडी परिधान केली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या लुकमधील काही फोटोदेखील तिने शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्रवीण तरडे आणि सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टार कास्ट असलेला धमाल कॉमेडी चित्रपट ‘ पांडू ‘ प्रेक्षकांना प्रचंड भावला. लोकांनी अनुभवलेला दादा कोंडके यांचा पांडू तर एव्हर ग्रीन आहेच. पण या नव्या काळातील नव्या कलाकारांनी साकारलेला पांडुसुद्धा प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे या चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल ८ पुरस्कार मिळवून पुरस्कार सोहळा गाजवला आहे. यांपैकी महत्वाचे तीन पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट गीत हे पुरस्कार पांडूने पटकावले आहेत.

Tags: Awards CeremonyInstagram PostPandu Moviesonalee kulkarniViral Photoszee talkies
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group