हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आज अचानक भावनिक झाली आहे. कारणही तितकंच विशेष आहे. आज तिने १५ वर्षांपूर्वी साकारलेल्या बकुळा या पात्राने १५ वर्ष पूर्ण केली आहेत. केदार शिंदेंच्या २००७ साली आलेल्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून सोनालीने मराठी सिने विश्वात पदार्पण केले. यानंतर तिने भरभरून काम केले आणि आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. यानिमित्त तिने आज खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘१५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत ‘बकुळा’ म्हणून प्रवेश केला… आणि तुम्ही तुमच्या मनात घर करू दिलं.. तेव्हा पासून आजतागायत दिलेल्या प्रेमाबद्द्ल मी ऋणी आहे आणि कायम राहणार.. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाने, या भूमिकेने खूप दिलं – पुरस्कारांपासून ते स्वतःची ओळख, चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभं राहण्याची ताकद पासून ते माय बाप रसिक प्रेक्षकांची साथ! हा १५ वर्षांचा प्रवास पुढची कमीत कमी अजून १५ वर्षं असाच सुरू ठेवण्यासाठी तुमची नेहमी सारखी पाठीवर थाप असूद्या, बास..
यासोबत ताजा कलमचा शेरा ओढत सोनालीने लिहिले कि, ‘केदार शिंदे सर तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास, माझ्यावर घेतलेली मेहनत आणि दिलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर हा प्रवास मी सुरू करू शकले, याची जाणिव आणि कृतज्ञनता कायम बाळगून ठेवीन,’. सोनालीची पोस्ट सध्या सोशल मिडीआयवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांच्या मुख्य भूमिका होत्या. विनोदी आणि तितकाच विचार करायला लावणारा हा चित्रपट चांगला गाजला. वेंधळ्या नवऱ्याची धाकड बायको जी सावकाराला धडा शिकवते त्या ‘बकुळा’ची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
Discussion about this post