Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मुलगा झाला मुलगा! अभिनेत्री सोनम कपूरने दिला गोंडस बाळाला जन्म

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Sonam Kapoor
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री सोनम कपूरची प्रेग्नेंसी हा ट्रेंडिंग विषय होता. कारण प्रेग्नेंसीदरम्यान सोनमचा बदललेला अंदाज, बेबी बंप फोटोशूट आणि मॅटर्नल ड्रेसिंग स्टाईल सगळं काही हटके होत. तिचे चाहते आणि कुटुंबीय बाळाची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर आता प्रतीक्षा संपली. कारण अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली असून तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. तीन आणि आनंदला पहिले पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती स्वतः सोनमने सोशल मीडियावर दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनमने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिचा आनंददेखील गगनात मावेना झाला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हि बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज २० ऑगस्ट २०२२ रोजी मी एका लहान बाळाला जन्म दिला आहे. आमच्या या प्रवासात आमच्यामागे खंबीरपणे उभे असणारे डॉक्टर्स, नर्स, मित्र- परिवार आणि कुटुंबिय यांचे मी आणि आनंद आम्ही दोघेही मनापासून आभार मानतो. आमचा नवीन प्रवास आजपासून सुरु झाला आहे. आता बाळाच्या येण्याने आमचं आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे.’

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

अभिनेत्री सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांचे हे पहिलेच बाळ असून आपल्या पालकत्वासाठी ते दोघेही उत्सुक होते. सध्या कपूर आणि अहुजा परिवारात नुसता आनंदी आनंद आहे. सोनमने बाळाच्या जन्माची माहिती दिल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरची आई आणि दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर यांनी तिची पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

m

सोबत सोनमचे वडील आणि अभिनेता अनिल कपूर आणि आई सुनीता कपूर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सोनम आणि आनंद यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोनमने शेअर केलेल्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करीत आहेत. मुख्य म्हणजे, प्रसूतीनंतर बाळ आणि आई सोनम दोघेही सुखरूप तसेच व्यवस्थित आहेत.

Tags: anil kapoorBlessed With Baby BoyInstagram PostSonam Kapoorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group