मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री सोनम कपूरने जेएनयूतील हिंसाचाराबाबत निषेध नोंदवत आपन विद्यार्थ्यांसमवेत असल्याचे सांगितले आहे. सोनमने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत जेएनयूतील विद्यार्थी धाडसी असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण जर आत्ता काहिच बोललो नाही तर पुढील पिढी आपल्याला आपण ज्या गोष्टींसाठी उभे राहायला हवे होते तेव्हा आपण उभे राहिलो नाही यासाठी लक्षात ठेवेल असं म्हटलं आहे.
मी फार क्वचितच सोशल मीडियावर राजकारणाबाबत मत व्यक्त करते. कारण माझ्या मताचा कोण विचार करेल असं मला वाटतं. मला ज्या गोष्टींबद्दल कमी समज आहे अशा गोष्टींबाबत मत व्यक्त करण्यास मी परिपुर्ण आहे काय? असा प्रश्न मला पडतो. परंतु जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा मला भीती वाटते की आपण ज्या गोष्टींसाठी उभे राहायला हवे होते, ज्या गोष्टींविरोधात बोलणे आवश्यक होते त्याबाबत आपण बघ्याची भुमिका घेतली. आपण ज्या गोष्टींसाठी उभे राहायला हवे होते तेव्हा आपण उभे राहिलो नाही त्याबद्दल कदाचित आपल्याला आठवले जाईल असं म्हणत सोनम कपूरने जेएनयू हिंसाचाराबाबत आपलं मत व्यक्त केले आहे.
मला माहित आहे की हे आपण नाही आहोत. मला माहित आहे की हे बरोबर नाही. जे घाबरुन न पटणार्या गोष्टींविरोधात आवाज उठवत नाहियेत ते चूक करत आहेत. माझ्या ओळखीचे बरेच चांगले लोक समजूतदारपणा आणि सहानुभूतीसह प्रामाणिकपणाची प्रतिक्रिया देतात. प्रामाणिक व्हा, आपला आवाज वापरा आणि सत्य सांगा असं म्हणत सोनमने यावेळी आपल्या चाहत्यांना चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
https://www.instagram.com/p/B6_WqiTFLQq/
आपल्या देशात जे घडत आहे ते परके आणि अपरिचित वाटते आहे. आम्ही येथे कसे आलो याची मला खात्री नाही. हे नेहमीच लपलेले सत्य आहे की जर आपली मते खूपच जोरात किंवा लोकप्रिय नसतील तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. मात्र आता आपण प्रत्यक्ष तिथे पोहोचलो आहोत. आता हे भयावह आहे असं म्हणत सोनमने आपण जेएनयू मधील विद्यार्थ्यांसमवेत असल्याचे सांगितले आहे.