हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीसोबत लढत आहे. दरम्यान कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईमध्ये हजारो उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक परप्रांतीय मजुर अडकले होते. ना काम होत ना खाण्यापिण्याची काही सोय होती. अशा वेळी त्यांना त्यांच्या राज्यामध्ये पाठविण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने प्रयत्न केले आणि त्यांना त्यांच्या माणसांकडे पाठवले. असे केले नसते तर शेकडो जणांचा भुकेने मृत्यू झाला असता, असे सोनू सूद म्हणाला. हे आता म्हणण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच संसदेत अशी काही वक्तव्ये केली कि त्यामुळे सोनू सूदला त्याचा राग आवरता आला नाही.
On assembly polls' eve, PM Modi exudes confidence of BJP's victory in all 5 states
Read @ANI Story | https://t.co/8DZAjagzzf#PMModi #AssemblyElections2022 pic.twitter.com/MpyD9TzPiQ
— ANI Digital (@ani_digital) February 9, 2022
मोदींच्या वक्तव्यानुसार, कोरोना महाराष्ट्रातून पसरला कारण अनेक मजुरांना स्थलांतरित केले गेले. यावर सोनू सूद म्हणाला कि, कोरोना एका राज्याचा नव्हता, पूर्ण देशालाच कोरोनाने घेरलेले होते. तो महाराष्ट्रातून पसरला असे कसे म्हणता येईल? खरंतर इथे मला कुणाच्याही विधानावर टीका करायची नाही. मात्र तेव्हा मजूर असहाय होते. रात्रीबेरात्री मला फोन करायचे. रडायचे. त्यांचा हा असा आक्रोश मला बघवत नव्हता. चारपाच महिन्याची बाळे घेऊन महिला रोज यायच्या. आम्हाला गावी जाऊ द्या अशी वारंवार विनवणी करायच्या. संपूर्ण स्थिती अत्यंत भयंकर होती. दरम्यान तीन हजार लोकांना स्थलांतरित करण्याची परवानगी मिळाली असता सहा-सहा हजार लोक येऊन उभे राहत होते. त्यामुळे त्यांना तेव्हा पाठविले नसते तर ते अन् त्यांची मुलं रस्त्यावर मरून पडली असती.
पुढे म्हणाला, त्यांच्याकडे खायला पैसे नव्हते. घरभाड्यासाठी पैसे नव्हते. मग प्रवासासाठी कुठून पैसे येतील? त्यांना त्यांच्या माणसांजवळ परत पाठविणे हे भावनिकदृष्ट्याही त्यांना मोठा धीर देणारे ठरले. यामुळे ते कोरोना पसरवायला गेले असे नाही म्हणता येणार. ते संकट इतके भीषण होते की, त्या धक्क्यातून लोक आजही सावरलेले नाहीत. राजकारणात मी जाणार नाही, असे अजिबात नाही. पण ती वेळ अजून आलेली नाही. अजून काही वर्षे मी सामाजिक कार्य करत राहणार. सध्या मी मुंबईजवळ एक हॉस्पिटल उभारतोय. याशिवायही मला बरंच काही करायचं आहे.
Discussion about this post