हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे . यामुळे सद्यपरिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होऊ लागली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १५ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आला आहे. या कोरोनाच्या जाळ्यात अनेक बॉलिवूड कलाकार देखील अडकले आहेत. अनेक कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडवर संकटाचे सावट तयार झाले आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी कोरोना काळात लोकांसाठी देवदूत बनलेल्या सोनू सूदलाही कोरोनाची लागण झाली होती. पण अगदी आठवड्याभरात सोनुने कोरोनावर मात केली आहे. यावर कंगनाने सोनूला जनजागृती करण्याचे निवेदन केले आहे.
सोनू सूदला कोरोना झाल्याची बातमी पसरल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी सोशल मीडियावरून सोनू सूदला स्वतःची काळजी घे आणि लवकर बरा हो असे मेसेज आणि समीक्षा केल्या होत्या. तसेच त्याच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून अनेकांनी प्रार्थना देखील केल्या होत्या. लोकांच्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने आता सोनूने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. महत्वाचं म्हणजे त्याने फक्त आठ दिवसांतच कोरोनावर मात केली आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात तो सगळ्यांचे आभार मानतोय.
https://twitter.com/KanganaTeam/status/1385611505945747458
यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने एक ट्विट केले आहे. यावेळी तिने सोनू सूदला संबोधून ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये लोकांना आता व्हॅक्सिन घेण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे तिने लिहिले आहे. कंगनाने म्हटले की, सोनूजी तुम्ही पहिला व्हॅक्सिनचा डोस घेतला आणि त्यामुळेच लवकरात लवकर तुमच्या तब्येतीत सुधारणा होऊन तुम्ही कोरोनामुक्तही झालात. भारतात बनलेल्या व्हॅक्सिन आणि त्याच्या परिणामांचे तुम्हाला कौतुक करायला हवेच. तर इतकेच नाही आता लोकांनाही लस घेण्यासाठी तुम्ही जागृत करायला हवे.
टीवी रिमोट छोड़िए,
देश जोड़िए।
दूसरों की जान बचाएंगे,
तभी तो जी पाएंगे।— sonu sood (@SonuSood) April 21, 2021
कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी शासनाने घातलेल्या निर्बंधानुसार अनेकजण आपल्या घरी बसून टीव्हीवरील कोरोनाविषयक बातम्या पाहत आहेत. या बातम्यांमुळे लोकांच्या चिंतेत आणखीच भर पडू लागली आहे. अशात सोनू सूदने लोकांना एक मोलाचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता. टीव्ही रिमोट सोडा, देश जोडा. दुस-यांचा जीव वाचवाल, तेव्हा तर जगू शकाल, असे त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले होते.
Discussion about this post