Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नाही पण..’; ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमाच्या अपयशावर सोनू सूदची प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Prithviraj
0
SHARES
27
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अर्थात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अक्षय कुमार अभिनित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. चित्रपटाचे कथानक ऐतिहासिक असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणार अशी अपेक्षा होती. मात्र झालं उलटंच. ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशील आपटला. कमाईच्या बाबतीत म्हणायचं तर कशीबशी ३९ कोटींपर्यंत चित्रपटाने कमाई केली आहे. चित्रपट येण्याआधी चांगलाच चर्चेत होता पण बॉक्स ऑफिसवर मात्र अगदीच निराशा झाली. आता यावर चित्रपटात अन्य मुख्य भूमिकेत दिसलेल्या अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात अभिनेता सोनू सूदने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यामध्ये तो चंद वरदई’च्या भूमिकेत आहे. त्याच्या अभिनयाचं सर्व स्तरांवर कौतुक होत असलं तरीही चित्रपटाला फारसा प्रतिसाद न मिळाल्याची सल त्यालाही आहेच. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता सोनू सूदला चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आवश्यक प्रतिसाद मिळाला नाही याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, ‘हा चित्रपट माझ्यासाठी अत्यंत खास आहे. कारण मला यात एक महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली. लोकांनीही या भूमिकेसाठी मला खूप प्रेम दिलं. मी माझ्या प्रेक्षकांचे या प्रेमासाठी खरंच मनापासून आभार मानतो. या चित्रपटाला कदाचित अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसेल. मात्र आम्हाला हे मान्य करायची गरज आहे की, कोरोनाच्या भयंकर साथीनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मला विचाराल तर यातूनही लोकांनी जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे.’

 

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

गेल्या शुक्रवारी ३ जून २०२२ रोजी ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आणि त्याच्यासोबत मानुषी चिल्लर स्त्री मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची इतरही स्टार कास्ट जबरदस्त आहे. मात्र तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आतापर्यंत १०.७० कोटी रुपयांसह पहिल्या दिवशी खातं उघडणारा हा चित्रपट शनिवारी १२.६० कोटी तर रविवारी १६.१० कोटी रुपये इतकी कमाई करू शकला आहे. म्हणजेच पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली.

Tags: akshay kumarBox Office EarningInstagram PostPruthvirajSonu Sood
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group