हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद हा केवळ बॉलिवूड नव्हे तर टॉलिवूड सिनेविश्वाचादेखील स्टार आहे. त्याचे चाहते सर्वत्र पसरलेले आहेत. सोनू सूद हा एक उत्तम अभिनेता आहेच. शिवाय तो एक चांगला माणूससुद्धा आहे. याची प्रचिती कोरोना महामारीच्या काळात सगळ्यांनाच आली. मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मदतीशील अभिनेता आणि संकटकाळी देवासारखा धावून येणारा सेलिब्रेटी म्हणून सोनू सूदची ओळख आहे. अलीकडेच ओडिसामध्ये जो रेल्वे अपघात झाला त्या घटनेने सर्वांनाच हादरा बसला. यावर अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केलं, जाब विचारला. पण मदतीसाठी पुन्हा एकदा सोनू सुदचं सरसावला.
#WATCH | Latest visuals from the site of the deadly train accident in Odisha’s Balasore. Rescue operations underway
The current death toll stands at 233 pic.twitter.com/H1aMrr3zxR
— ANI (@ANI) June 3, 2023
ओडिसामध्ये जो रेल्वे अपघात झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या घटनेत २५० हून अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या वाईट काळात अनेक संघटनांनी पुढे येऊन अपघातातील प्रवाशांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यामध्ये अभिनेता सोनू सूदच्या सामाजिक संघटनेनेसुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. अन्य सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले, श्रद्धांजली वाहिली. काहींनी तर या अपघाताला कोण जबाबदार..? म्हणून शंख फुंकले. पण मदतीसाठी कुणीच पुढे आलं नाही. अशात पुन्हा एकदा सोनू सूदने मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्याच्या दानशूर व्यक्तिमत्वाचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
अभिनेता सोनू सूदने एक व्हिडिओ शेअर करत ओडिसा रेल्वे अपघातग्रस्तांना त्यांचे जीवन पुनर्निर्माण करण्यात मदत करण्याचे वचन दिले आहे. शिवाय अपघाग्रस्तांना त्यांचा व्यवसाय स्थापन करण्यासाठी, शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्याची टीम सक्रीयपणे काम करत आहे. यासाठी सोनू सूदने एक हेल्प लाईन नंबर सुरु केला आहे. ज्याच्या माध्यमातून मदतग्रस्त त्याच्यापर्यंत पोहचू शकतील.
View this post on Instagram
तसेच SMS द्वारे ९९ ६७५६ ७५२० या क्रमांकावर संपर्क साधूनदेखील त्याच्या टीमशी संपर्क करता येईल. SMS मिळताच त्याची टीम त्वरित प्रतिसाद देईल आणि मदत करेल असे सोनुने सांगितले आहे. सोनू सूदची ही मदत ओडिसा रेल्वे अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसाठी लाख मोलाची ठरते आहे.
Discussion about this post