हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोव्हीडच्या महाभयंकर काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी देवदूत ठरला. त्याने अनेकांना मदत करीत या काळात एक वेगळे उदाहरण निर्माण केले. त्यामुळे त्याच होत त्याहून जास्त फॅन फॉलोईंग वाढलं आहे. पण गेल्या काही तासांपासून हाच गरिबांचा दाता चक्क ट्रोल होतो आहे. या ट्रोलिंग कारण ठरतंय त्याच व्हायरल होणारा व्हिडीओ. ज्या व्हिडिओमध्ये तो ट्रेनने प्रवास करताना दिसतोय. ट्रेनचा प्रवास जगताना दिसतोय आणि मुख्य म्हणजे स्टेशनवरील नळाचे पाणी पिताना दिसतोय. दरम्यान त्याने या पाण्याला सुपर हेल्दी म्हटलं आहे आणि इथेच तो फसला.
अभिनेता सोनू सूदने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती कधी स्टेशनवर बसलेल्या श्वानावर प्रेम करताना दिसतोय. तर कधी मुंबई लोकलमधून प्रवास करत दरवाज्यातून मस्त गार हवा खाण्याचा अनुभव घेताना दिसतो. या दरम्यान तो एका स्टेशनवर उतरुन तिथल्या सार्वजनिक नळावर पाणीदेखील पिताना दिसला आहे. शिवाय या व्हिडिओत त्याने या पाण्याला त्यानं कोणत्याही बिसलेरी किंवा मिनरल पाण्यापेक्षा उत्तम असल्याचा दर्जा दिला आहे. हे ऐकून नेटकरी मात्र चक्रावले. अनेकांना त्याचे हे विधान पटलेलं नाही.
या व्हिडिओत सोनू रेल्वे स्थानकावरील एका बाकड्यावर झोपलेला दिसतोय. त्यानंतर तो व्हिडीओ शूट करणाऱ्याला मजेशीर पद्धतीने म्हणतो, ‘अरे भावा, का त्रास देतोयस? स्टेशनवर देखील सुखानं झोपून देत नाही. पण एक गोष्ट खरं सांगू का, हेच खरं स्टेशनचं आयुष्य. आम्ही लोक आता बोईसरमध्ये आहोत. रात्रीचे १० वाजले आहेत. शूटिंग पॅकअप केलं आणि थेट इथे आलो. जे इथलं रेल्वे स्थानकावरचं आयुष्य आहे, ते कुठेच पहायला मिळत नाही. यानंतर तो मुंबईची लोकल ट्रेन पकडतो आणि त्यात जाऊन बसतो. कधी दरवाज्यावर उभा राहतो. दरम्यान रेल्वे स्थानकावर उतरून पाणी पिट म्हणतो की, मित्रांनो हे जे पाणी आहे ते जगातल्या कुठल्याही बिसलरी,मिनरल वॉटरपेक्षा आरोग्याला चांगलं आहे’. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, सोनू बरा अभिनेता आहे. पण या पाण्याला हेल्दी म्हणणं आपल्याला काही पटलं नाही. तर कोणी म्हणतंय ते पाणी खारट असतं. याशिवाय आणखी एकाने तर ‘काय राव.. काहीही बोलायचं?’ अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
Discussion about this post