हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। त्याचं काय आहे आजकाल तरुण मंडळी नुसती सोशल मीडियाला डोळे लावून बसलेली असतात. फेसबुक, व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट.. बापरे बाप.. सोशल मीडिया ऍप म्हणजे मोबाईलमध्ये साठवला जाणारा एका प्रकारचा कचराच झाला आहे. पण काही म्हणा, सोशल मीडिया चालू आहे म्हणून अनेकांची पोटं चालतात हे हि तितकंच खरं. पण या सोशल मीडियावर काही मैत्रीचा तुडुंब झरा वाहणारी लोक असतात जी ओळखीच्या काय अनोळखी व्यक्तींचाही आयुष्यात घुसत असतात. ओळख वाढवण्यासाठी जेवलीस का? जेवण झालं का? हे असले प्रश्न औषधांच्या डोससारखे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री विचारले जातात. याचाच संदर्भ घेऊन स्पृहा जोशीने एक भन्नाट व्हिडिओ तयार केलाय जो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.
अभिनेत्री स्पृहा जोशीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रिएटर आणि मिम्स मेकर सुमित पाटीलही दिसतो आहे. हा एक अतिशय भन्नाट असा व्हिडीओ आहे. यामध्ये तयार केलेले गाणे हे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या ‘एवढंच ना’ या गाण्यावर बनवलेले पॅरडी सॉंग आहे. यामध्ये स्पृहा ती वैतागलेली मुलगी आहे जिला एक सोशल मीडिया फ्रेंड वारंवार ‘जेवलीस का..? हा प्रश्न विचारून त्रास देतो आहे. अखेर ती त्याला ब्लॉक करून टाकते. पण फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यापासून ते ब्लॉक होईपर्यंतचा हा ‘जेवलीस का..?’ प्रवास पाहण्यात काही औरच मजा आहे.
या पॅरडी सॉंगचे बोल खालीलप्रमाणे आहेत. :-
जेवलीस का..? इतकं बोलू.. जेवलीस का..?
आमचं झालं… तुमचं कधी..? २
एव्हढंच बोलून ऑफलाईन जा ना
जेवलीस का..? इतकं बोलू.. जेवलीस का..?
रात्रीला २ दुपारला २ २
एव्हढे मेसेज करतंय कोण..?
मेसेजला काय रिप्लायचं नाय
मेसेजला काय तुझा रिप्लायचं नाय
अजून उपाशीच आहेस का तू..?
जेवलीस का..? इतकं बोलू.. जेवलीस का..?
BLOCKED
असे हे भन्नाट गाणे आणि त्यावर बनवलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. अतिशय भन्नाट आणि मजेशीर असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसला नाहीत तर नवलंच. यावर कुशल बद्रिकेसारख्या हास्यवीरापासुन अनेकांनी हास्याच्या इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ओमकार केसकरने प्रतिक्रियेत लिहिलंय कि, ‘एखाद्या मुलीशी कसं बोलणं सुरू करायचं या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देणारं एक अँथेम साँग दिल्याबद्दल आभार! सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियासाठी ट्रेंडिंग विषय झाला आहे.
Discussion about this post