हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दहीहंडी यंदा आणखीच जोशात आहे. कारण कोव्हीड महामारीमुळे हा सण गेली २ वर्ष गोपाळांना साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाचा गोपाळकाला एकदम जोरात आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत या सणावर अनेक गाणी आहेत. त्यापैकी एका गाण्याची खास आठवण शेअर करत अभिनेत्री स्पृहा जोशीने के पोस्ट शेअर केली आहे आणि त्याच्यासोबत गोविंदा रे गोपाळा असे कॅप्शनही लिहिले आहे. या गाण्याची झलक पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत आणि यावर विविध कमेंट्स करीत आहेत.
अभिनेत्री स्पृहा जोशीची मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट ‘मोरया’ने प्रेक्षकांना चांगलेच मोहले होते. यातील गाण्यांचं तर आजही क्रेझ कायम आहे. मुंबईतील गणेशोत्सव आणि दोन मंडळातील संघर्ष असे या चित्रपटाचे कथानक होते. हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला असून याचे दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केले होते. या चित्रपटात संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, दिलीप प्रभावळकर असे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. याच चित्रपटातील हे गाणे आहे. ज्यामध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करताना दाखवले आहे.
‘आला रे आला गोविंदा आला… गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा’ असे या गाण्याचे बोल चांगलेच थिरकवतात आणि शेवटी ‘नाद करायचा नाही औंदा आला दहा थरांचा गोविंदा’ हे यंदाच्या उत्सवाला अगदी तंतोतंत जुळत आहे. त्यामुळे यंदा या गाण्याला एक वेगळीच डीमांड आहे.
हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड गाजलं होतं. यामध्ये अभिनेता संतोष जावेकर आणि स्पृहा जोशी दोघेही दिसत आहेत. शिवाय यात त्यांचा एक खास सीन देखील आहे. तोच सीन आज स्पृहाने शेअर करत गाण्याच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
स्पृहाने केलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट तिच्यासाठी फार खास ठरला. शिवाय स्पृहाचे बालपण मुंबईत गेल्यामूळे तिचे आणि दहीहंडीचे खास नाते आहे. साहजिकच यंदाचा २ वर्षानंतरचा गोपाळकाला उत्साहात साजरा होत आहे आणि म्हणून स्पृहाचं हे गाणं सगळीकडे डंका गाजवत असेल यात काहीच वाद नाही.
Discussion about this post