हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बिग बॉस या लोकप्रिय रिऍलिटी शोचे मराठी, हिंदी आणि कन्नड असे विविध भाषिक नवे सीजन सुरु झाले आहेत. नेहमीप्रमाणे या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सध्या मराठी आणि हिंदी बिग बॉसचे पर्व जोरदार गाजत असून या शोमधील पहिले एव्हिक्शन पार पडले आहे. कलर्स टीव्ही वरील बिग बॉस १६ मधून स्पर्धक श्रीजीता डे घराबाहेर झाली आहे. तर दुसरीकडे मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वातून स्पर्धक निखिल राजेशिर्के याचं एव्हिक्शन झालं आहे.
या एव्हिक्शन्समूळे कुठे ना कुठे श्रीजीता तसेच निखिलचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र घरातील इतर स्पर्धकांपैकी काही स्पर्धक खुश तर काही स्पर्धक दुखी झाले असल्याचे दिसले. यानंतर खरं तर या खेळाला खरी सुरुवात झाली असे म्हणता एइकल. कारण पहिल्या एव्हिक्शन नंतर घरातील प्रत्येक सदस्याला आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी भिडायचं असतं. आता आजपासून पुढील भागांमध्ये हे स्पर्धक काय कमाल करतात आणि पुढच्या नॉमिनेशनमध्ये कुणावर एव्हिक्शनची टांगती तलवार राहणार हे पाहता येईल.
सध्या ‘बिग बॉस १६ आणि बिग बॉस मराठी ४ हे दोन्ही सीजन प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यातल्या त्यात बिग बॉस मराठीपेक्षा यंदा बिग बॉस हिंदीकडे प्रेक्षकांचे झुकते माप दिसत आहे. तर अनेक प्रेक्षक केवळ बिग बॉसचा विकेंड वार किंवा मांजरेकरांनी चावडी पाहण्यासाठीच हे पर्व पाहत आहेत. बिग बॉसचे विविध भाषेतील विविध पर्व वुट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतात. त्यामुळे बराच प्रेक्षक वर्ग टेलिव्हिजनवर बिग बॉसचा एपिसोड पाहू शकला नाही तर वुटवर जरूर पाहतो.
Discussion about this post