हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुतेक बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि संकटं यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आहे. काही ना काही कारणांमुळे शाहरुख वारंवार अडचणीत येताना दिसतोच आहे. गतवर्षी त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्जच्या केसमध्ये अडकला आणि शाहरुखची मानहानी झाली. यानंतर त्याने चित्रपट सृष्टीतून काहीसा ब्रेक घेतला. यानंतर आता तो पुन्हा चित्रपट करतोय तर बॉयकॉटचं वादळ घोंगावू लागलं. एव्हढं कमीच तर आता कस्टम विभागाकडून शाहरुखला तब्बल ६.८३ लाखाचा दणका बसला आहे. कसा आणि का ते जाणून घेऊया.
माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून रोखण्यात आले. यावेळी त्याच्या बॅगमध्ये अनेक महागडी घड्याळे, बाबून आणि झुर्बक घड्याळे, रोलेक्स घड्याळांचे ६ बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे, ऍपल सिरीजची घड्याळे सापडली. याशिवाय काही घड्याळांचे रिकामे बॉक्सदेखील सापडले. कस्टम्सने या घड्याळांचे मूल्यांकन केले आणि त्यानंतर यावर १७ लाख ५६ हजार ५०० रुपये कस्टम ड्युटी लावली. जवळपास तासभर चौकशी करुन त्याला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरुन घेऊन सोडून दिले. हि घटना सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी याने ६ लाख ८७ हजार रुपये कस्टम पेमेंट केले. पण सूत्रांनुसार, हे पैसे शाहरुख खानच्या क्रेडिट कार्डवरून भरण्यात आले आहेत. सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त पुगल आणि युद्धवीर यादव यांनी ही संपूर्ण कारवाई केली. या कारवाईनंतर शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा दादलानी एअरपोर्टबाहेर स्पॉट झाले. यावेळी आपल्या प्रसिद्धीचा वापर न करता दंड भरून अधिकाऱ्यांना सहकार्य केल्याबद्दल शाहरुखचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
Discussion about this post