Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘इतना हल्का नहीं हूं मैं…’; ‘बॉयकॉट पठाण’ ट्रेंडदरम्यान शाहरुखचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 17, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
SRK
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत नामांकित अभिनेता आहे. असे असूनही गेल्या काही काळापासून त्याच्या आयुष्यात एका वर एक संकटं येताना दिसत आहेत. शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्याचे आपण पाहतच आहोत. सोशल मीडियावर एव्हढं मोठं फॅन फॉलोईंग असूनही शाहरुख खान आणि त्याचा चित्रपट ट्रोल होतोय. नुसता ट्रोल नाही तर नेटकरी हा चित्रपट बॉयकॉट करायचं म्हणत आहेत. संपूर्ण सोशल मीडियावर बॉयकॉटचं वादळ सुरु असताना आता शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल चांगलाच व्हायरल होतो आहे.

#ShahRukhKhan
"इतना हल्का नहीं हूं मैं, की बॉयकॉट ट्रेंड की हवा से हिल जाऊं"- बादशाह शाहरुक खान।@iamsrk pic.twitter.com/QrS2MIQ5wz

— Aishwarya Paliwal (@AishPaliwal) December 16, 2022

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सर्वत्र वाद पेटला आहे. अगदी राजकारण्यांपासून, हिंदू संघटनांपर्यंत आणि सोशल मीडियावरील युजर्सने दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेतला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर बॉयकॉट पठाण ट्रेंड करत आहे. अनेक संघटनांनी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारादेखील दिला आहे. दिवसेंदिवस हे बॉयकॉट प्रकरण पेटत चाललं आहे. अशातच बॉयकॉट ट्रेंडवरील शाहरुखचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

हि एक व्हिडीओ पोस्ट आहे जी चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये शाहरूख खान म्हणतोय कि, ‘इतना हल्का नहीं हूं मैं, की बॉयकॉट ट्रेंड की हवा से हिल जाऊं’. सध्या सोशल मिडीयावर शाहरूखचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ जुना असला तरीही आता या व्हिडिओची एक वेगळीच डीमांड आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

हा व्हिडीओ त्याच्या एका जुन्या मुलाखतीदरम्यानचा आहे. पठाण वरील वादादरम्यान शाहरूखने कोलकातातील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली होती कि, ‘जग काहीही करू शकते, पण जोपर्यंत सकारात्मक लोक जिवंत आहेत, तोपर्यंत कोणीही काहीही करू शकत नाही, ‘जग काहीही करू शकते यावर माझा अजिबात आक्षेप नाही… पण मी आणि तुम्ही आणि सर्व सकारात्मक लोक… जिवंत आहोत.’

Tags: bollywood actorboycottInstagram PostPathanShahrukh KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group