हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मागील २ वर्षाचा काळ हा कोरोना नामक विषाणूने गिळंकृत केला असे समजून आता कुठे जनजीवन पूर्वपथावर येऊ लागले आहे. मात्र या दरम्यान कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच आता निर्बंध शिथिल केल्यानंतर गेल्या २ वर्षांपासून खोळंबलेल्या राज्य नाट्य स्पर्धा पुन्हा एकदा सुरु होत आहेत. उद्यापासून म्हणजेच २१ फेब्रुवारी २०२२ पासून औरंगाबादमध्ये राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात होतेय. दरम्यान औरंगाबाद विभागातील १४ नाट्य प्रयोगांची ही स्पर्धा तापडिया रंगामंदिरात सायंकाळी ७ वाजता सुरु होईल. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या पुढाकारातून या राज्य स्तरीय नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय नाटकांचे यंदा ६० वे वर्ष आहे. जाणून घेऊया या नाट्य मेजवानीत नाट्यप्रेमींना कोणती नाटके पाहायला मिळणार आहेत ते खालीलप्रमाणे:-
उद्यापासून औरंगाबादच्या तापडिया रंगमंदिरात सुरु होणाऱ्या नाट्य स्पर्धांचे मुख्य समन्वयक म्हणून रमाकांत भालेराव हे काम पहात आहेत. स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची नावं नावे आणि तारखा पुढीलप्रमाणे:-
२१ फेब्रुवारी २०२२ – नरके टाकळी व्हाया स्वर्गारोहण- ले. राजकुमार तांगडे, दिग्दर्शन स्वप्निल पवार
२२ फेब्रुवारी २०२२ – ढग- अविनाश चिटणीस, शिवाजी मेस्त्री
२३ फेब्रुवारी २०२२ – देव चोरला माझा, सुमीत तौर, सिद्धांत पाईकराव
२४ फेब्रुवारी २०२२ – अण्णाच्या शेवटच्या इच्छा- विजयकुमार राख, रामेश्वर झिंजुर्डे
२५ फेब्रुवारी २०२२ लिव्ह इन रिलेशनशिप- श्रुती वानखेडे, ऋषीकेश रत्नपारखी
२६ फेब्रुवारी २०२२ – आर यू व्हर्जिन- सतीश लिंगडे
०१ मार्च २०२२ – पाझर, प्रवीण पाटेकर
०२ मार्च २०२२ – कडूतात्या- गणेश मुंडे
०३ मार्च २०२२ – रावणायण- रावबा गजमल
०४ मार्च २०२ – गाजराची पुंडी- प्रा. यशवंत देशमुख, उषा कांबळे
०५ मार्च २०२२ – टेक अ चान्स- मनोज ठाकूर
०७ मार्च २०२२ – अस्तित्व- सुनील बनकर
०८ मार्च २०२२ – अॅनेक्स- विभाराणी, डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, नितीन गरुड
०९ मार्च २०२२ – त्यात काय लाजायचं- राजेंद्र सपकाळ
Discussion about this post