हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लॊकप्रिय अभिनेता सुबोध भावे विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यात पटाईत आहे. आजतागायत त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. यामुळे त्याला मराठी इंडस्ट्रीतला सर्वगुणसंपन्न अभिनेता म्हणून ओळखले जाते. सुबोध भावेने साकारलेल्या धीर गंभीर भूमिकांची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पडताना दिसते. ‘बालगंधर्व’. ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारखे बायोपिक असोत किंवा कोणतीही ऐतिहासिक भूमिका. प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देण्यात सुबोध भावेने कोणतीच कसर सोडलेली नाही. अशीच आणखी एक ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध भूमिका साकारायला सुबोध भावे आता सज्ज झाला आहे.
‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटावर विविध मुद्दे उखरून वाद निर्माण करण्यात आले. ज्यामुळॆ आता ‘बापजन्मात कुठल्या बायोपीकमध्ये काम करणार नाही”. अशी भूमिका सुबोध भावेने घेतली. यानंतर आता पुढे सुबोध भावे कोणत्याही बायोपिक किंवा ऐतिहासिक प्रोजेक्टचा भाग नसेल असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र सुबोधने शेअर केलेल्या त्याच्या आगामी पोस्टवर लवकरच ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ या नव्या वेबसिरीजमध्ये सुबोध बुद्धिमान बिरबलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याची माहिती मिळताच सुबोधने चाहतेही आनंदाने न्हाहून गेले आहेत.
एका दिमाखदार सोहळ्यात या सिरीजची घोषणा करण्यात आली असून यामध्ये मुघल साम्राज्य, त्यांच्यातील सत्तासंघर्ष आणि वारसा हक्कासाठी झालेले कलह आपल्या समोर येणार आहेत. या निमित्ताने सुबोध भावे बिरबल साकारत हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार असल्याने त्याला पहायची एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुबोधने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय कि, ‘लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या, ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या “बिरबल”ची व्यक्तिरेखा या आगामी वेबमालिकेमध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय. लवकरच काही दिवसात ही वेब मालिका तुम्हाला Zee 5 वर पाहता येईल’. हि वेब सिरीज हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच याचा लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे.
Discussion about this post